नवी दिल्लीः कर्तव्याशी प्रामाणिक असलेला मनुष्य प्रत्यक्ष मृत्यूलाही घाबरत नाही..दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांनी हे दाखवून दिलं आहे.छत्तीसगढमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केेलेल्या हल्ल्यात साहू यांचा मृत्यू झाला.मृत्यूला सामोरं जात असतानाची साहू यांची मनोवस्था त्यांचे सहकारी मोर मुकुट शर्मा यांनी चित्रित केली आहे.एका बहाद्दर कॅमेरामनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.अंगावर शहारे आणणार्‍या या व्हिडिओत साहूनी आपण आपल्या आईवर फार प्रेम करतो असं म्हटलं आहे.
नक्षली हल्ल्यातून मोर मुकुट शर्मा हे बालंबाल बचावले..ते सांगतात,तीन पत्रकार आणि सुरक्षा दलाचे जवान असे मिळून आम्ही दहाजण जात असताना शेतात दबा धरून बसलेल्या नक्षलींनी आमच्यावर हल्ला केला.अच्युतानंद साहूची मोटर सायकल सर्वात पुढे होती.हल्ला झाला तेव्हा त्याची दुचाकी रस्त्यावर पडली.आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात आसरा घेतला होता.सुमारे चाळीस मिनिटे गोळीबार सुरू होता.असा भयानक गोळ्यांचा आवाज सिनेमात ऐकला होता.आमच्याबरोबर केवळ सात जवान होते त्यातील दोन जण शहिद झाले होते.जे जवान बचावले ते रस्त्यावर आल्यानंतर नक्षलींनी पळ काढला.
हे सारं घडत असताना शर्मा यांनी साहू यांचे अखेरचे शब्द कॅमेरयात टिपले..हा निडर पत्रकार मृत्यूला घाबरला नाही..आईच्या आठवणींनी मात्र गदगदला..बचना मुश्कील है,लेकिन क्यू पता नही मौत का डर नही लग रहा है हे साहू यांचे अखेरचे शब्द अंगावर शहारे आणतात हे नक्की..
पत्रकारांना शिव्या घालणं सोपं आहे…पण पत्रकाराचं आयुष्य एवढं सोपं नाही हे शिव्या घालणारांनी लक्षात घेतलं पाहिजे.

When death was close

He thought these were his last moments. But he survived….. #DDNews video journalist Mor Mukut Sharma shared his heart-wrenching ordeal as the dastardly #naxal attack in #Dantewada was underway. A salute to his bravery and courage even in the face of death

Posted by DDNewsLive on Wednesday, October 31, 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here