हिंगोलीः हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या ह्लल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना नांदेड येथील एका खासगी रूग्णालात दाखल करण्यात आले असून आज दुपारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
तोष्णीवाल यांच्यावरील हल्ल्याने महाराष्ट्रातील पत्रकार जगतात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्यातील हल्लेखोरांना तातडीने अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे. आज सकाळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी तसेच विभागीय सचिव विजय जोशी यांनी रूग्णालायत जाऊन तोष्णीवाल यांची चौकशी केली.संजीव कुलकर्णी आणि विजय जोशी यांच्या् नेतृत्वाखाली परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज पोलीस महानिरिक्षक प्रसाद यांची भेट घेऊन आरोपींना अटक कऱण्याची मागणी केली.

परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस अनिल महाजन तसेच माजी अध्यक्ष माधव अंभोरे कळमनुरीत पोहोचत असून ते हिंगोली येथे जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्याना निवेदन सादर करतील.हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला गेला असून आज परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यवतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.कळमनुरीमध्येही आज बंद यशस्वी होत आहे.राज्यातील विविध जिल्हा आणि तालुका संघानी पत्रक काढून तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध केला आहे.
विविध सामाजिक संघटनांनी देखील तोष्णीवाल यांच्यावरील हल्लाय्चा निषेध केला आहे.सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्‍वंभर चौधरी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here