परिषदेचा नवा उपक्रम

0
659

उत्कृष्ट तालुका पत्रकार संघांनाही परिषद पुरस्कार देऊन सन्मानित करणार

मराठी पत्रकार परिषदेशी जोडल्या गेलेल्या राज्यातील 35 जिल्हा संघांपैकी सर्वोत्कृष्ट कार्य करणार्‍या एका जिल्हा संघाला दरवर्षी रंगा अण्णा वैद्य उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.2013 साली वर्षी हा पुरस्कार नाशिक जिल्हा संघांला तर 2014 चा पुरस्कार भंडारा जिल्हा संघाला देण्यात आला आहे.जिल्हा संघाच्या धर्तीवरच यावर्षीपासून राज्यातील तालुका संघांना देखील परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत काणे यांच्या नावाने उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.राज्यातील प्रत्येक महसुली विभागातून एक या प्रमाणे 9 तालुका संघांना दरवर्षी सन्मानित केले जाणार आहे.त्या विभागातले विभागीय सचिव आणि जिल्हा अध्यक्ष परिषदेकडे आपल्या विभागातील सर्वोत्कृष्ट तालुका संघाची पुरस्कारासाठी परिषदेकडे शिफारस करतील.त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परिषदेला असेल.मात्र ज्या तालुका संघाची शिफारस होईल त्या संघाला त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल परिषदेकडे पाठवावा लागेल.त्यानंतरच शिफारस मान्य करायची की अमान्य त्यावर निर्णय घेतला जाईल..दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितऱण करण्यात येईल.साधारणतः संघटनात्मक एकजूट,परिषदेच्या कार्यातील सहभाग,विविध सामाजिक उपक्रम,कार्यातील सातत्य, आदि बाबींचा पुरस्कार देताना विचार केला तसेच संस्थेच्या निवडणुका दर दोन वर्षांनी नियमित होतात की,नाही त्याचा देखील पुरस्कार देताना विचार केला जाणार असल्याचे परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here