नमस्कार.
मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी,विभागीय सचिव,जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांना विनंती करण्यात येते की,यापुर्वीच जाहिर झाल्याप्रमाणे मराठी पत्रकार परिषदेचा बहुप्रतिक्षित तालुका अध्यक्षांचा मेळावा येत्या 24 जून रोजी सातारा जिल्हयातील पाटण येथे होत आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या 80 वर्षांच्या इतिहासात प्रथमच तालुका अध्यक्षांचा मेळावा होत आहे.तालुका अध्यक्षांशी संवाद साधताना त्यांच्या भावना आणि प्रश्‍न जाणून घेणे हा मेळाव्या मागचा उद्देश आहे.संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत कशी करता येईल,रचनेत काही बदल करता येतील काय याचाही विचार या मेळाव्यात होणार आहे.या मेळाव्यातच तालुका आणि जिल्हयांना जाहिर झालेले आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
पाटण हे तालुक्याचं ठिकाण असलं तरी हजार लोक बसू शकतील एवढा मोठा हॉल तेथे आहे.दूरवरून कोणी एकदिवस अगोदर येणार असेल तर त्याची निवास व्यवस्थाही शक्य आहे.त्यामुळं कोणतीही सबब न सांगता जास्तीत जास्त अध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्‍यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती आहे.या मेळाव्यात परिषद विविध प्रश्‍नावर काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण महाराष्टा्राचे लक्ष आहे.तेव्हा कृपया 24 जून 2018 ही तारीख लक्षात ठेवावी. या मेळाव्यात ऑनलाईन मिडिया सेलची स्थापना केली जाणार आहे..त्यामुळं युट्यूब चॅनल किंवा न्यूज वेबसाईट चालविणार्‍या पत्रकार मित्रांनीही या मेळाव्यात उपस्थित राहावे.असे आवाहन मराठी पत्रकार परिषद करीत आहे.

LEAVE A REPLY