
चेन्नईः रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका पत्रकाराला कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आपल्या गाडीत घेतात,त्याच्या जखमांवर फुंकर घालतात आणि त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल करतात या घटनेची छायाचित्रं चार दिवसांपुर्वी देशभर सोशल मिडियावर फिरली.राहूल गांधींच्या मानवतावादाचा हा प्रकार ताजा असतानाच आज नेमकी त्याच्या उलट घटना तामिळनाडूतील विरूधूनगर लोकसभा मतदार संघात घडली.तेथील कॉग्रेसच्या एका सभेच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढताना एका पत्रकाराला कॉग्रेस कार्यक्तर्यांनी बेदम मारहाण केली.गंमत अशी की,यावेळी पक्षाचे उमेदवार तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते पण कोणीही मध्यस्थी करून हा हल्ला रोखला नाही.उलट पत्रकार आर.एम.मुथूराज यांना मारहाण होत असताना त्यांच्या बचावासाठी आलेल्या अऩ्य पत्रकारांनाही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.याचा व्हिडिओ सध्या देशभर व्हायरल होत आहे.
सभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या असल्या तरी सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता अशाच बातम्या पत्रकारांनी दिल्या पाहिजेत असा सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.असं झालं नाही तर संबंधित पत्रकार ट्रोल होतो किंवा त्याला फटके तरी दिले जातात.काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला कमी प्रतिसाद मिळाला.तश्या बातम्या माध्यमांनी छापल्यानंतर तमाम भक्तगणांचे माथे भडकले होते.या बातम्या देणार्यांना त्यांनी ट्रोलही केले.म्हणजे पत्रकारांच्या बाबतीत सर्वच पक्षाचा दृष्टीकोण समान असतो हेच यातून स्पष्ट झाले.
तामिळनाडूत कॉग्रेसवाल्यांची पत्रकाराला मारहाण