डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांवर भडकले,
म्हणाले,तुम्ही कपटी,खोटारडे आहात
 
 
अनेक वादविवादांनंतरही अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी देशातील अग्रगण्य वृत्तवाहिन्यांचे उच्चपदस्थ आणि पत्रकारांना भेटीसाठी निमंत्रित केले होते. निवडणुकीपूर्वी अनेक वाहिन्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात रान उठवले होते. त्याचा राग त्यांनी या बैठकीत काढला. तुम्ही पत्रकार अप्रामाणिक, कपटी आणि खोटारडे आहात, अशा शब्दांत त्यांनी या प्रतिनिधींवर ताशेरे ओढले.
 
यापुढे माध्यमांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याशी मधुर भाषेत संभाषण साधण्याऐवजी ट्रम्प आक्रमकपणे बोलत होते, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. तुम्ही न्याय्य व तंतोतंत वृत्तांकन करण्यात व मला आणि माझ्या अमेरिकी नागरिकांप्रतिची ध्येयधोरणे समजण्यात अपयशी ठरलात, असे ट्रम्प यांनी सुनावल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले आहे, तर ते वेळोवेळी अयोग्य आणि अप्रमाणिक या शब्दांचा वापर करत होते, ‘द डेली’ने नमूद केले आहे.
 
या बैठकीला ‘एबीसी न्यूज’चे वृत्त निवेदक जॉर्ज स्टेफनोपौलोस आणि डेव्हिड मुइर, ‘सीएनएन’चे वोल्फ ब्लिटझर आणि एरिन बर्नेट आणि ‘एबीसी’चे बातमीदार मार्था रॅडट्झ यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
 
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
(महाराष्ट्र टाइम्सवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here