डोंगरचा राजाला शुभेच्छा

बीड जिल्ह्यातील वडवणी येथील पत्रकार अनिल वाघमारे यांनी सा. डोंगरचा राजा सुरू केले त्या घटनेला आज पाच वर्षे झाली.. अनिल वाघमारे यांचे अभिनंदन आणि डोंगरचा राजा ला शुभेच्छा…
बीड जिल्ह्यातील वडवणी हा मागास तालुका, कोणतेही उद्याेग नाही, मोठी बाजारपेठ नाही तरीही अनिल वाघमारे यांनी धाडस करून डोंगरचा राजा सुरू केले.. घरात पत्रकारितेची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही तरीही पत्रकारितेवरील निष्ठा आणि सचोटी व प़ीमाणिकपणाचया बळावर डोंगरचा राजानं लोकांचा विश्वास आणि आश्रय मिळविला. मृदु स्वभाव, सवॅसमावेशक भूमिका आणि राजकारणातील सवॅ गटांशी चांगले संबंध यामुळे डोंगरचा राजाची वाटचाल निर्धारानं सुरू आहे.. पाच वर्षे झाली, या काळात एकाही अंकाचा खंड नाही तरीही डोंगरचा राजा अजुनही सरकारी यादीवर नाही.. अनेक बोगस नियतकालिकं सरकारी जाहिरातींचा मलिदा लाटत असताना एक व़त म्हणून पत्रकारिता करणारया डोंगरचा राजा सारख्या साप्ताहिकांना मात्र सरकारी आश्रय मिळू नये याची खंत वाटते.. सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं आता तरी डोंगरचा राजाचा विचार करावा एवढीच अपेक्षा..
डोंगरचा राजा परिवारास वर्धापनदिनी हादि॓क शुभेच्छा
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY