डोंगरचा राजा हे वडवणीसाऱख्या छोटया तालुक्यातून प्रसिध्द होणारं साप्ताहिक.ग्रामीण भागातलं वृत्तपत्र असलं तरी निःपक्ष भूमिका,भाषा,अंकाची मांडणी,आणि सातत्य या सर्व बाबतीत उजवे.यामुळं वडवणी शहर आणि तालुक्यात डोंगरचा राजा हे नियतकालिक अल्पावधीत लोकप्रिय ठरलं आहे.

अत्यंत कष्टानं प्रतिकूल परिस्थितीशी चार हात करीत,आणि येणार्‍या संकटावर मात करीत अनिल वाघमारे यांनी डोंगरचा राजा सुरू केले, ते प्रयत्नपूर्वक चालविले आणि यशस्वी करूनही दाखविले.चिकाटी,प्रयत्न आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या अनिल वाघमारे यांच्या भूमिकेमुळं डोंगरचा राजा प्रगतीचे एक एक टप्पे पूर्ण करीत असून आता डोंगरचा राजा ऑनलाईन होत आहे.दोन वर्षाच्या आत डोंगरचा राजाची ही प्रगती नक्कीच कौतूकास्पद आहे.वृत्तपत्र चालविणे,दर्जा टिकविणे हे सारं कठिण होत असताना केवळ प्रामाणिकपणाच्या,आणि वृत्तपत्रीय निष्ठेच्या बळावर अनिल वाघमारे यांनी हे यश मिळविले आहे.घरात पत्रकारितेचा कोणताही वारसा नाही,अत्यंत छोटी छोटी कामं करीत अनिल वाघमारे यांनी अगोदर जिल्हास्तरीय वर्तमानपत्रांसाठी कामं केली आणि दोन वर्षापूर्वी स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले आहे.त्यांची धडपड,चिकाटी मी पाहिलेली असल्यानंच मला त्यांच्या यशाचं विशेष कौतूक आहे.आवृत्तीला आणि अनिल वाघमारे यांना मनापासून शुभेच्छा.

डोंगरचा राजाची वेबसाईटचे डिझाइन माझा मुलगा सुधांशूनं केलं आहे.डोंगरचा राजाला आवश्य भेट देऊन वडवणी तालुका आणि बीड जिल्हयातील राजकीय,सामाजिक घडामोडींबाबबत अपडेट रहा… डोंगरचा राजाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

http://dongarcharaja.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here