रस्त्यावर उतरून हल्लेखोरांना आव्हान देण्यात ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर पत्रकार संघ नेहमीच आघाडीवर असतो.काल मुंबईत तीन छायाचित्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज ठाण्यात पत्रकारांनी रस्त्यावर येत आंदोलन केले.नंतर जिल्हाधिकाऱी यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली गेली.यावेळी शहर आणि परिसरातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.पनवेलमधील पत्रकार देखील आज सायंकाळी तहसिलदारांना भेटून हल्लेखोरांवर कारवाई करावी यामागणीसाठी निवेदन देणार आहेत..