• आधार’बाबतची बातमी भोवली,
    ‘ट्रिब्यून’च्या पत्रकाराविरोधात गुन्

‘आधार’बाबतची माहिती अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱ्या ‘द ट्रिब्यून’च्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (यूआयडीएआय) अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून फसवणूक, आधार अॅक्ट आणि आयटी अॅक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने ३ जानेवारी रोजी ‘आधार’बाबत वृत्त दिले होते. ट्रिब्यूनच्या पत्रकार रचना खेरा यांनी ही बातमी दिली होती. रचना खेरा यांनी काही एजंट्सशी संपर्क साधला होता. या एजंट्सनी ५०० रुपयांमध्ये रचना यांना एक सॉफ्टवेअर आणि लॉग इन आयडी, पासवर्ड दिला. या सॉफ्टेवेअरवर लॉग इन केल्यावर कोणताही आधार क्रमांक टाकल्यावर त्याबाबतची माहिती मिळवणे शक्य झाले. आणखी ३०० रुपये दिल्यावर एजंट्सने रचना यांना आधार कार्ड प्रिंट करणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध करुन दिले होते.
ट्रिब्यूनच्या वृत्ताने आधार कार्डाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. एकीकडे सरकारने बँक, मोबाईल क्रमांक, सरकारी योजनांसाठी आधार सक्ती केली असताना दुसरीकडे आधारची माहिती अशा स्वरुपात उपलब्ध होत असल्याने देशभरात खळबळ माजली होती. यूआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्तासंबंधी ट्रिब्यूनला नोटीस बजावली होती.

शनिवारी यूआयडीएआयने या वृत्ताप्रकरणी थेट गुन्हा दाखल केला. फसवणूक आणि अन्य कलमांखाली ही कारवाई करण्यात आली. ट्रिब्यूनच्या पत्रकाराने अवैध मार्गाने ‘आधार’ची माहिती मिळवली. पत्रकाराने गुन्हेगारी कटात सामील होऊन कायद्याचे उल्लंघन केले, असे यूआयडीएआयच्या अधिकाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ट्रिब्यूनच्या मुख्य संपादकांनी या वृत्तावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आरोपींमध्ये अनिल कुमार, सुनील कुमार आणि राज यांचा देखील समावेश आहे. हे सर्व एजंट्स असून त्यांच्याकडूनच रचना यांनी ही माहिती मिळवली होती.

  • दरम्यान, या वृत्तानंतरही यूआयडीएआयने स्पष्टीकरण दिले होते. कार्डधारकांची आधारबद्दलची माहिती सुरक्षित असून त्याचा गैरवापर हेरणे शक्यत असल्याचा दावा यूआयडीएआयने केला होता. आधारची माहिती उघड होत असल्याचे वृत्तही प्राधिकरणाने फेटाळून लावले होते( लोकसत्तावरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here