सरकार कोणाचं येईल ते येईल पण मी चॅनलच्या तमाम पत्रकारांचं आणि छायाचित्रकारांचं अभिनंदन यासाठी करतो की, छोटया – मोठ्या राजकीय घडामोडींची सविसतर बातमी त्यांनी कव्हर करून राज्यातील जनतेला ती अवगत केली.. मातोश्री असेल, वर्षा असेल, सिल्व्हर ओक असेल, राज भवन असेल अशा सर्व सत्ता केंद्रातील बातम्या कव्हर केल्या गेल्या आहेत.. बातमी मिळविण्यासाठी पत्रकारांची धावपळ, त्यामुळं होणारी उपासमार, जाग्रणं, नेत्यांच्या घरासमोरची कंटाळवाणी प्रतिक्षा, नेत्यांच्या बाईटसाठी चाललेली जिवघेणी स्पर्धा, वेळेत द्यावे लागणारे लाइव्ह बाईट, अॅंकर काय प्रश्न विचारू शकतो याचा अंदाज घेऊन करावी लागणारी तयारी आणि प्रेक्षकांना आवडेल ती माहिती देताना, ते कंटाळणार नाहीत याची काळजी घेणे आणि त्याच बरोबर आपल्या चॅनलंच धोरण सांभाळणं आणि टीआरपीचाही विचार करणं ही सारी कसरत आमचे पत्रकार मित्र गेली पंधरा दिवस समर्थपणे करीत आहेत.. हे सारं राजकीय नाट्य कव्हर करणारया तमाम पत्रकार मित्रांचं आणि फोटोग्राफर्स यांचं अभिनंदन..

मराठी पत्रकार परिषदेला आपला सार्थ अभिमान आहे..पत्रकारांच्या नावानं बोटं मोडणारयांनी पत्रकारांना घ्याव्या लागणारया या कष्टाची थोडी तरी जाणीव ठेवावी अशी अपेक्षा आहे..

LEAVE A REPLY