अलिबागच्या समुद्रात पर्यटनाचा आंनंद लुटणार्‍या पर्यटकावर काल सायंकाळी जेली फिशने हल्ला केल्याने पाच पर्यटक जखमी झाले असून त्यातील चौघांवर अलिबागच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून एका जखमीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आङे.काल शनिवारची सुटी असल्याने पर्यटकांची मोठी संख्या होती.पर्यटक आनंद लुटत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेल्या जेली फीशने पर्यटकांवर हल्ला चढविला.पर्यटकांना जेली सारखा पदार्थ पाण्यावर तरंगता दिसला.त्यातील काही पर्यटकांनी त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न केला असता जेली फीश हाताला आणि पायाला चिकटले आणि त्यानी पर्यटकांचा चावा घेतला.त्यात पाच जण जखमी झाले आहेत.जेलीच्या चाव्याने शरीरभर आग निर्माण होेते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून समुद्र किनार्‍यापासून आत आठ दहा फुटावर जेलीचा वावर सुरू असल्याने मच्छिमारांना देखील त्याचा त्रास होऊ लागला आहे.त्यामुळे बोटी देखील किनार्‍यावर आणण्याची वेळ आली असल्याचे रायगड जिल्हा मच्चिमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी सांगितले.अलिबाग ,वरसोलीच्या किनार्‍यावर हे जेलीफीश अचानक कसे आले याबद्दल चर्चा सुरू आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here