kishore 3 गुजरात: ऑफिसमध्ये घुसून पत्रकाराची हत्या

गुजरातमधील जुनाkishoreगडमध्ये सोमवारी रात्री वर्तमानपत्राच्या कार्यालयात घुसून एका पत्रकाराची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमागे भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री रतिलाल सुरेजा यांचा मुलगा डॉ. भावेश याचा हात असल्याचा आरोप
मृत पत्रकाराच्या भावाने केला असून पोलिसांनी भावेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

किशोर दवे असे मृत पत्रकाराचे नाव आहे. ‘जय हिंद’ नावाच्या वर्तमानपत्रात ते ब्यूरो चीफ होते. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हे सोमवारी जूनागडमधील वंजारी चौकातील आपल्या कार्यालयात काम करत असतानाच रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. किशोर यांच्यावर चाकूने अनेक वार करून हल्लेखोर पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या किशोर यांना कार्यालयातच मृत्यू झाला.

वर्षभरापासून सुरू होता वाद

गेल्या एक वर्षापासून किशोर आणि भावेश सुरेजा यांच्यात वाद सुरू होता. त्या वादातूनच ही हत्या घडवण्यात आली असावी, असा संशय किशोर यांचा भाऊ प्रकाशने व्यक्त केला आहे. भावेश सुरेजा यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याबाबत किशोर यांनी आपल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याने हा वाद सुरू झाला. याप्रकरणी भावेश यांनी किशोर यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला तसेच दुसरीकडे भावेश व रतिलाल सुरेजा यांच्या गुंडांकडून किशोरला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. याबाबत आम्ही पोलिसांकडेही लेखी तक्रार दिली होती, असे प्रकाश यांनी सांगितले

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या निर्घृण हत्याकांडाचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून हल्लेखोरावर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.

मटावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here