जी.जी.परिख यांना पद्मश्री द्या…

0
847

“पद्म” हे देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहेत.ते देण्याबाबत काही निकषही आहेत.बऱ्याचदा हे निकष खुंटीला बांधून ठेवले जातात.नको त्या व्यक्तींना पुरस्कार देण्यासाठी… मग मागणी होते हे पुरस्कार परत घ्या अशी… सध्या सैफ अली खानच्या बाबतीत हे सुरूय.हा सारा तमाशा पाहिला म्हणजे  पद्म पुरस्कार योग्य माणसंच देशात मिळत नाहीत की,केवळ मतांवर डोळा ठेऊन हे पुरस्कार दिले जातात असा प्रश्न पडतो. पद्म पुरस्कारांंची अशी उधळण करून त्याचं म्हहत्व कमी करू नये.कारण या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल अशी ऋुषीतुल्य असंख्य माणसं देशात आहेत.वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत निष्ठंनं, सचोटीनं आणि सर्वस्व विसरून काम करणाऱ्या माणसांची ददात नाही.जी.जी.परिख हे अशा ऋुषीतुल्य व्यक्तींपैकी.हे कोण जी.जी.परिख असा प्रश्न काहीजण विचारू शकतील.दोष ज्यांना जी जी परिख माहित नाहीत त्याचंा नाही.सैफ अली खान हे आम्हाला आमचे आदर्श वाटत असतील तर जी.जी.परिख विस्मृतीत जाणं अगदीच स्वाभाविक आहे.मात्र पद्म पुरस्कार समितीला तरी जी.जी.परिख यांची आठवण राहायला हवी होती.ती राहू नये याचं मनस्वी दुःख होतंय.

जी.जी.परिख हे स्वातंत्र्यसैनिक आहेत.सर्वोच्च त्याग,देशावर प्रचंड प्रेम,कामावर तेवढीच निष्ठा, नव्वदीत पदार्पन करीत असतानाही तरूणाला लाजवेल असा सळसळता उत्साह,समाजवादी विचारांवर निस्सीम श्रध्दा असलेल्या जी.जी.परिख यांना सरकारनं आता तरी पद्मश्री हा पुरस्कार द्यावा अशी इच्छा माझ्यासारख्या त्यांच्या अनेक चाहत्यांची आहे.रायगड जिल्हयात युसुफ मेहर अली सेंटरसाठी जी.जी.जे काम करीत आहेत,असंख्य अडचणीवर मात करीत या सेंटरचा गाडा हाकताना जे मोठं सामाजिक कार्य ते करीत आहेत त्याला तोड नाही.प्रसिध्दी पासून पुरस्कारांपासून दूर असलेल्या जी.जी.चा रायगड प्रेस क्लबनं मध्यंतरी त्याला “गाफिल”  ठेऊन म्हणजे त्यांना न सांगता ह्दय सत्कार केला होता.कार्यक्रम आहे,तुम्ही या असं त्यांना सांगितलं आणि तेथे त्याचंा मानपत्र देऊन सन्मान केला.त्यांनी देशासाठी आयुष्य वेचले त्यांच्या ऋुणातून उतराई होण्यासाठी केंद्रानं त्याना पद्मश्री हा पुरस्कार द्यावा अशी आमची मागणी आहे.तसं पत्रही मी मुख्यमंत्र्यांना पाठविलं आहे.मात्र सरकारचे प्राधान्यक्रम,आणि जी.जी.कडं मतांचा गठ्‌टा नसल्यानं हे होईलच याची खात्री देता येत नाही.
जी.जी.परिख  90व्या वर्षात पदर्पण करीत आहेत.त्यांनिमित्त्त युसुफ मेहेर अली सेंटर तारा जि.रायगड येथे एक कार्यक्रम उद्या रविवारी होत आहे.भाई वैद्य,मेधा पाटकर आणि देशभरातून शेकडो साथी या कार्यक्रमास येत आहेत.. हा पुरस्कार दिला गेला तर तो जी.जी.चा नव्हे तर पद्मश्री पुरस्काराचा सन्मान ठरेल असं मला वाटत.( एस.एम.)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here