जीन्स म्हणाली धोतराला
तुझं बाबा बरं आहे,
माझं तर अस्तित्वच
अजूनही लोकांना खूपत आहे.
आता एवढंच बाकी होतं.आमच्या बोलण्यावर निर्बंध,आमच्या लिहिण्यावर निर्बंध,आता आम्ही कपडे कोणते घालायचे यावरही आक्षेप.एकूण पत्रकार जमातच आता सर्वाच्या डोळ्यात खुपायला लागली.खरं तर पत्रकारांसाठी काही ड्रेस कोड नाही.पुर्वी,झब्बा,साधी ट्रावझर,पायात चप्पल आणि गळ्यात शबनम बॅग या अवतारात सायकलवरून जाणारे पत्रकार भेटायचे.म्हणजे अशा वेशात असणारी व्यक्ती पत्रकार म्हणून ओळखली जायची.काळानुरूप यामध्ये बदल झालाय.बहुतेक पत्रकार जीन्स ,टी शर्टमध्ये दिसू लागले.महिला पत्रकारांनीही सोयीचा म्हणून याच ड्रेसला पसंती दिली.परंतू हे देखील लोकांना मान्य नाही.साधनशुचिता,सभ्यपणा,सात्विक आचार-विचार या सवार्र्चा ठेका जसा पत्रकारांनीच घेतला अशा अविर्भावात पत्रकारांना सुनावलं जातं..इतरांना कोणतेही नियम,निर्बंध नाहीत.सारी आफत पत्रकारांवरच.आता बोला ?.पत्रकारांनी काय धोती,टोपी घालूनच कामावर यायला पाहिजे ? सरकार पत्रकारांसाठी वेगवेगळे नियम करीत असते.भविष्यात आता ड्रेस कोडही करायला हरकत नसावी.वीस वीस वर्षे पत्रकार आपल्या प्रश्नांसाठी झगडत आहेत त्याकडं कोणी बघत नाही ,किंवा पत्रकारांना पगार किती मिळतो?,पत्रकारांना मजिठिया लागू झालाय का? पत्रकारांच्या आरोग्याची कुणी काळजी घेतंय का? यावरही कोणी प्रश्न विचारत नाही.पत्रकारांना नोकरीची हमी आहे काय ? असाही सवाल कोणी करीत नाही मात्र पत्रकाराला ड्रेस कोड आहे काय? असे सवाल विचारले जातात.आणि पत्रकारांनी टी शर्ट आणि जीन्स घालण्याबद्दल आक्षेपही घेतले जात आहेत.यावर काय बोलावं? .बोललं तर ब्रह्महत्या व्हायची आणि आमची अडचण व्हायची..त्यामुळं चला उद्यापासून टी शर्ट आणि जीन्सला रामराम म्हणू…