रायगड जिल्हा परिषदेच्या 2015-16 च्या 67 कोटी,73 लाख 50 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागासाठी 14 कोटी 70 लाख रूपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याने विरोधकांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
रायगड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यावेळी जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अर्थ सभापती चित्रा पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण,आरोग्य,महिला विकासासाठी भरीव तरतूद कऱण्यात आली आहे.पांढरा गुणकारी कांदा अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो हा कांदा आणि कलिंगडासाठी पीक प्रोत्साहन म्हणून 50 टक्के अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.जिल्हयातील अनेक शाळा शतकोत्तर महोत्सव साजरा करीत असल्यानं त्यांच्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद कऱण्यात आली आहे.शाळांच्या दुरूस्ती,शिक्षण समिती सदस्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी देखील भरीव तरतूद कऱण्यात आली आहे.जिल्हायतील जनतेने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे,