जाफराबादमधील मोगलाई

जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर मागील आठवड्यात वाळू माफियांनी फिल्मी स्टाईलनं हल्ला केला .पंधरा-वीस जणांचं टोळकं ज्ञानेश्‍वरवर तुटून पडलं.लाठया-काठयांनी ज्ञानेश्‍वरला बदडलं गेलं.मार लागला..डोकं फुटलं.. ज्ञानेश्‍वरला चार दिवस औरंगाबादला उपचार घ्यावे लागले..ज्ञानेश्‍वरनं पोलिसात तक्रार दाखल केली..अपेक्षा अशी होती की,ज्या वाळू माफियांनी ज्ञानेश्वर वर हल्ला केला त्यांना तातडीने अटक होईल..सुदैवानं स्थानिक पोलिसांनी कारवाईलाही सुरूवात केली.आरोपी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयात लपल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी कार्यालयाची झाडाझडती घेतली.केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाची तपासणी करण्याचं धाडस पोलिसांनी दाखविल्याबद्दल खऱं तर त्यांचं अभिनंदन व्हायला हवं होतं.झालं उलटच.दानवे साहेबांनी एस.पी.कडे तक्रार केली.विषयाला कलाटणी देण्यासाठीची ही योजना होती.तसंच घडलं.मुळ विषयाला बगल देत एस.पी.महोदयांनी पाच पोलिसांना तातडीने सस्पेंड केलं,काय गुन्हा होता त्यांचा? ते केवळ आपली डयुटी करीत होते.एका पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची तपासणी करीत होते.पण ही निस्पृहता त्यांना महागात पडली.ते घरी बसले.प्रकरण एवढ्यावर थांबलं असतं तर ते जाफराबाद कसलं? ज्या ज्ञानेश्‍वरला वाळू माफियांनी मरेस्तोवर मारलं ते वाळू माफिया अजून मोकाट आहेत.त्याचा तपास करून त्याना अटक करण्याबाबत कोणी बोलतच नाही..उलट आता ज्ञानेश्‍वरवरच खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलम 307 लावलं गेलंय.ते ही गुन्हा घडल्यानंतर आठ दिवसांनी.. एकट्या ज्ञानेश्‍वरवरच नाही तर हल्ल्याच्या वेळेस तेथे हजर नसलेल्या त्यांच्या वडिलांना देखील अडकविलं गेलंय.पत्रकार ज्ञानेश्‍वरला आयुष्यातून उठविण्याचा फुल्ल प्लॅन तयार केला गेलाय.सर्व हितसंबंधियांनी मिळून..
गुन्हा काय होता ज्ञानेश्‍वरचा..? नद्यांना ओरबाडणार्‍या वाळू माफियांच्या विरोधात बातम्या देणं. हा जर गुन्हा असेल तर मग ज्ञानेश्‍वरवर केवळ 307चा गुन्हा दाखल करून भागणार नाही त्याला थेट फासावरच लटकवलं पाहिजे..कारण राजकारणी आणि अधिकरयांसाठी वाळू माफिया हे थोर समाजसेवक असतात हे पत्रकार पाबळेंना माहिती असायला हवं होतं..
आपण लोकशाही व्यवस्थेत जगत असलो तरी ही लोकशाही मुठभर धनदांडग्यासाठी विशेष मेहरबान असते हे देखील पाबळेंना बातमी देताना माहिती असायला हवं होतं.वृत्तपत्र स्वातंत्र्य हे भाषणातून टाळ्या मिळविण्यासाठीच असते याची देखील पाबळे यांना कल्पना असायला हवी होती एवढं सामांन्य ज्ञान नसेल तर ते पोलिसांच्या दृष्टीने नक्कीच दोषी आहेत..
आपण जालण्याच्या पोलिस अधीक्षकांना यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की, त्यांनी ज्ञानेश्वरवर देशद़ाहाचा गुन्हा दाखल केला नाही.. नाळू माफियांच्या विरोधात बातम्या देणं हे देशद़ाहापेक्षा कमी थोडचं?कारण हे माफिया देशासाठी किती महान कार्य करीत असतात.. त्यांच्या कार्यात अडथळा आणणारे देशद़ाहाीच की.. कदाचित राजकीय पातळीवर असाही डाव शिजत असेल.. कोणी सांगावं.. मोगलाईत काहीही शक्य असतं..
आपले काम निष्ठेनं करणारया ज्ञानेश्‍वरला आता छळ. छळ छळलं जातं आहे..कोण आहे या सर्वामागं? ,ज्ञानेश्‍वरवर हल्ला होऊन आठ दिवस लोटले तरी हल्लेखोरांना अटक का होत नाही? हल्लेखोर कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत? ,ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावरच हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत? राज्य सरकार जाफराबादची मोगलाई उघडया डोळ्यानं किती दिवस बघत बसणार आहे ? ,असे अनेक प्रश्‍न या निमित्तानं उपस्थित होत आहेत..गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे एक संवेदनशील नेते आहेत.पत्रकारांच्या व्यथांची त्याना कल्पना आहे.गृह मंत्र्यांना आमची विनंती आहे की त्यांनी जाफराबाद प्रकरणात लक्ष घालून एका पत्रकाराला न्याय द्यावा..अन्यथा ज्ञानेश्वरला आयुष्यातून उठविण्याचे सारे नियोजन झाले आहे..
एका पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचा आवाज बंद करण्याचा होत असलेला प़यत्न आणि जिल्हयातील पत्रकारांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा यंत्रणेचा डाव संतापजनक आणि निषेधार्थ आहे.. महाराष्ट्रातील तमाम पत्रकार ज्ञानेश्वर सोबत आहेत.. कारण कुठल्याही परिस्थितीत काळ सोकवता कामा नये..
मी लवकरच जाफराबादला भेट देत आहे.@S M S. M. Deshmukh .

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here