एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..
बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचा उर्वरित निधी तातडीने वर्ग करण्याचे आदेश.. स्मारक वेळेत पूर्ण होणार

मुंबई दि. 20 : सिंधुदुर्ग नगरीत होत असलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठीचा उर्वरित निधी तातडीने हस्तांतरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत..
एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन पत्रकारांचे विविध प्रश्न त्यांच्याकडे मांडले. या शिष्टमंडळात परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे तसेच ज्येष्ट पत्रकार मंदार पारकर आदिंचा समावेश होता..प़ारंभी परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या…
सिंधुदुर्ग नगरीत बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य स्मारक होत आहे.. त्यासाठी सरकारने साडेपाच कोटी रूपये मंजूर केले आहेत.. मात्र पूर्ण रक्कम हस्तांतरीत न झाल्याने स्मारकाचे काम रखडले आहे.. अडीच कोटींची रक्कम हस्तांतरीत करून स्मारक वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निधी तातडीने वर्ग करण्याचे आदेश संबंधित अधिकरयांना दिले आहेत.. त्यामुळे आता स्मारकाचा विषय मार्गी लागला आहे..
कोकणातील पत्रकारांनी सतत सहा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचया कामाला गती मिळाली आहे.. त्यामुळे या स्मारकाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी मागणी परिषदेच्यावतीने करण्यात आली.. त्यावर देखील सकारात्मक पध्दतीने विचार करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले..
ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत असल्याची तक़ार एस.एम.देशमुख यांनी केली, सन्मान योजनेच्या अटी अत्यंत जाचक असल्याने अनेक ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहात असल्याची तक़ार मुख्यमंत्र्यांकडे करून त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.. त्यावर कोणावरही अन्याय होणार याची काळजी घेउन नियमात योग्य त्या दुरूस्त्या करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले..
यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात छोटया वृत्तपत्रांची पडताळणीस स्थगिती देण्यात यावी, यु ट्यूब आणि पोर्टलसाठी नियमावली तयार करून त्यांना सरकारी जाहिराती देण्याची मागणी करण्यात आली आहे.. तसेच ज्या जिल्हयात पत्रकार भवनाचया इमारती नाहीत तेथे इमारत उभारण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.. या मागण्याचा सकारात्मक पध्दतीने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले..
यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसानिमित्त मंदार पारकर यांना शुभेच्छा दिल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here