जयंत पाटील यांची हुकूमशाङी खपवून घेणार नाही-दळवी

0
512

जयंत पाटील यांची हुकूमशाङी खपवून घेणार नाही-दळवी

शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी चित्रपट अभिनेता शाहरूख खान यांंच्याशी केलेले वर्तन अशोभनिय आणि अलिबागकरांची मान शरमेने खाली घालवायला लावणारे अलून जयंत पाटील यांची ही हुकूमशाही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शिवसेनेेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी दिल्याने हे प्रकरणा आता राजकीय बनले असल्याचे चित्र समोर आले आहे.
गेट वे अ‍ॅाफ इंडियावर जयंत पाटील यांनी शाहरूख खानला माझी परवानगी घेतल्याशिाय अलिबागला येता येणार नाही असा इशारा दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.त्याचे पडसाद रायगडमध्ये उमटले होते.मात्र आता याला राजकीय कलाटणी मिळाली असून महेंद्र दळवी यांनी काल पत्रकारांशी बोलताना अलिबागला येण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही अलिबागचे दरवाजे सर्व पर्यटकांसाठी खुले असून प्रत्येकाचे स्वागत केले जाईल असे स्पष्ट करीत जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.ः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here