चौकशीतून काही निषण्ण होण्याची शक्यता कमीच

0
439

*.. पुणे : पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची समिती नेमण्यात आली.. परंतू जम्बो कोविड सेंटर ज्या लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने चालविले जाते त्याचे पार्टनर सुजीत पाटकर यांनी जो अहवाल पुणे मनपाला दिला आहे त्यावरून या चौकशीतून काही निष्पन्न होणार नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.. रूग्णाचे *लाईफ सेव्हिंगसाठी* आवश्यक सर्व उपचार करण्यात आल्याचा दावा सुनील पाटकर यांनी केला आहे..पाटकर यांनी जो अहवाल पाठविलाय त्यात म्हटले आहे की, ” 31 ऑगस्ट रोजी रायकर यांना कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले.. त्यांना त्याच दिवशी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आणि ते स्टेबल झाले.. त्यानंतर त्यांना 1 तारखेला आयसीयूला शिफ्ट करण्यात आले.. मात्र नंतर त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णाला दिनानाथ मंगेशकरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.. त्यासाठी *कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स* उपलब्ध करण्याची कारवाई सुरू होती.. तोपर्यंत त्यांच्या उपचारा दरम्यान कोविड 19 च्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व प्रकारच्या उपचार पध्दतीचा अवलंब केला गेला.. असा दावा पाटकर यांनी केला आहे..तरीही सकाळी 4.30 वाजता त्यांची प्रकृती बिघडली.. एका मिनिटात ऑक्सिजन लेवल 50-55 पर्यंत खाली आली.. त्यानंतर त्यांना अॅसिडोसेस आणि शॉक झाला.. म्हणून त्यांना इन्ट्युबेट केले गेले. नंतर जनरल अॅनेसथिशिया दिला गेला.. इन्ट्युबेशन चांगले झाले.. त्यानंतर त्यांना अॅम्बयुबॅग लावण्यात आली.. त्यानंतर त्यांना वेंटिलेटर लावण्यात आले.. त्यांना वॉल्युम कंट्रोल मोडवर घेण्यात आले.. तरीही पेशन्ट उपचारांना प्रतिसाद देत नव्हता.. रूग्णाला वाचविण्यासाठी सर्व उपचार करण्यात आले.. पण उपयोग झाला नाही.. त्यांनी सीपीआर देण्यात आला. तरीही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.. रूग्ण सकाळी 5.30 वाजता दगावला.. कर्डिऔरिस्पेरेटरी फेल्युयर सेकंडरी डयू टू कोविड 19 हे मृत्यूचे कारण असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे..पाटकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांना पाठविलेल्या अहवालात Treatment protocol पूर्णता पाळला गेल्याचा दावा केला आहे..हा सर्व अहवाल पाहिल्यानंतर कोविड सेंटर अत्यंत आदर्श पध्दतीनं काम करतंय असं म्हणावं लागेल.. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन दिला जात असेल, वेंटिलेटर ची व्यवस्था झाली असेल, पेशन्ट आयसीयूत ठेवला गेलेला असेल तर मग रूग्णाला दिनानाथ मध्ये हलवावे असे रायकर यांच्या नातेवाईकांना का वाटले हा प्रश्न उरतो.. जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार दिनानाथमध्ये रात्रीच बेड उपलब्ध झाला होता पण कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था सकाळपर्यंत न झाल्याने रूग्णाला नमस्कार दिनानाथला हलविता आले नाही.. परिणामतः रूग्ण हातून गेला.. तरीही पाटकर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याची तयारी सुरू होती असे सांगत असतील तर ही तयारी कधी होणार होती हा प्रश्न उरतो..चौकशीची घोषणा झाल्यानंतर कोविड सेंटरनं आपल्याला हवी तशी कागदपत्रे तयार केलेली असू शकतात.. चौकशी समिती आहे ती कागदपत्रे तपासणार, आहे त्याच स्टाफकडेच चौकशी करणार असल्याने या चौकशी नाटयातून हाती काहीच लागणार नाही.. चौकशी केल्याचे समाधान मिळवत सरकार आणि मनपा सर्वांना बाइज्जत बरी करणार.. आणि आपण मात्र एक तरूण, उमदा पत्रकार मित्र गमावल्याचे दु:ख उरी बाळगून नित्याच्या व्यापात व्यस्त होणार….

23Sunil Walunj, Anil Mahajan and 21 others12 Comments2 SharesLikeCommentShare

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here