राजकीय आकलनशक्ती,वैचारिक परिपक्वता आणि उच्चविद्याविभूषित सौ.चित्रा आस्वाद पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला बांधकाम आणि अर्थ सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.चित्रा पाटील यांना विलंबाने का होईन न्याय मिळाला याचं स्वागत केले पाहिजे.गुणवत्ता,कार्यक्षमता असताना सत्तास्पर्धेत त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होत होता.राजकारणात अनेकदा कुवत नसलेली माणसंही पुढं जाताना दिसतात.यामध्ये त्यांचं कर्तृत्व कमी, कोणाचे तरी कृपाशिर्वाद जास्त असतात .अशी माणसं लौकिकार्थानं विविध पदंांचे भलेही मानकरी होऊ शकतात पण लोकांच्या मनात स्वतःचं स्थान ते कधीच निर्माण करू शकत नाहीत.हे प्राप्त कऱण्यासाठी कर्तृत्वतर हवंच असतं त्याच बरोबर लोकांच्या प्रती आपलेपणा हवा, लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होण्याची वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा दृष्टीकोण हवा असतो. याबरोबरच मोठ्यांच्या प्रती आदरभावही हवा असतो.स्वभावातही मृदूता हवी असते. हे सारे गुण विशेष चित्रा पाटील यांच्याकडं असल्यानं त्या आपल्या पदाला आणि पदाच्या माध्यमातून जिल्हयातील जनतेला नक्कीच न्याय देऊ शकतील. चित्रा पाटील स्वतः परिस्थितीशी चार हात करीत पुढं आलेल्या असल्यानं सामांन्यांच्या प्रती एक कणव त्यांच्या मनात नेहमीच दिसते.राजकारण्यांमध्ये हल्ली हे गुण अभावानेच दिसतात. तित्रा पाटील यांनी पेझारी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याची चुणूक दाखवून देत आपण नारायण नागू पाटलांचा वारसा समर्थ पणे पुढं चालवू शकतो हे दाखवून दिलं आहे.चित्रा पाटलांचंं वकृत्व प्रभावी आहे आणि त्या चांगल्या प्रशासक आहेत मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही त्याचं चांगलं प्रभुत्व आहे.त्यामुळंच बांधकाम आणि अर्थ ही दोन्ही मह्तवाची खाती त्या समर्थपणे साभाळू शकतील याबद्दल कोणाच्या मनात संशय नाही.े त्या उतणार नाहीत ,मातणार नाही आणि घेतला वसा नक्कीच यशस्वी करून दाखवतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही.चित्रा पाटील यांना त्याच्या राजकीय वाटचालीतील एका महत्वाच्या टप्प्यासाठी लाख लाख शुभेच्छा,
शोभना देशमुख