मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात प्रथमच

जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांसाठी 

सिंधुदुर्गात दोन दिवसीय कार्यशाळा

गोवा दर्शनाची देखील मिळणार संधी 

मुंबईः मराठी पत्रकार परिषदेच्या 80 वर्षांच्या इतिहासात प्रथमच परिषदेशी संलग्न जिल्हा संघांच्या पदाधिकार्‍यांकरीता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांची पंढरी असलेल्या सिंधुदुर्गा तील  सावंतवाड़ी येथे  21 आणि 22 डिसेंबर 2019 रोजी ही कार्यशाळा होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

जिल्हा संघाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष,सरचिटणीस तसेच परिषद प्रतिनिधी आणि सोशल मिडिया सेलचे दोन निमंत्रक आणि परिषदेचे पदाधिकारी या कार्यशाळेसाठी निमंत्रित आहेत.या दोन दिवसांच्या कार्यशाळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यशाळेचं औपचारिक उद्दघाटन होईल.त्यानंतरच्या पहिल्या सत्रात जिल्हा संघांच्या कार्य अहवालावर खुली चर्चा करण्यात येईल.जिल्हा संघांच्या अडचणी आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील यावरही विचारमंथन होईल.त्यामुळं प्रत्येक जिल्हा संघाच्या पदाधिकार्‍यानं येताना वर्षभरातील कार्यअहवाल,परिषदेची वार्षिक वर्गणी तसेच सदस्यांची नवी यादी घेऊन येणे आवश्यक आहे.दुपारच्या सत्रात परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख आणि विश्‍वस्त किरण नाईक यांचं मार्गदर्शन होईल तसेच काही तज्ज्ञांना मार्गदर्शन कऱण्यासाठी आमंत्रित कऱण्यात येत आहे.पहिल्या दिवशीचे दुसरे सत्र संपल्यानंतर बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक जेथे होत आहे त्या सिंधुदुर्गनगरीस भेट देऊन स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यात येईल.

रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या काळात गोवा दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या दौरयात गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच तेथील पत्रकार संघटनांशी चर्चेचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर गोव्यातील प्रमुख मंदिरं आणि कलंगुट आणि अन्य महत्वाच्या बिजेसला भेटी देण्यात येतील.प्रत्येक जिल्हयातून केवळ सहाच पदाधिकार्‍यांना कार्यशाळेत प्रवेश देण्यात येईल.प्रत्येकाला 150 रूपये नोंदणी  शूल्क आकारले जाणार आहे.निवास आणि भोजन व्यवस्था परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनं करण्यात येत आहे.

राज्यातील मुंबईसह 36 जिल्हयांमध्ये परिषदेच्या शाखा असून 8000वर पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्‍न परिषदेच्या रेटयामुळं सरकारला सोडवावे लागले आहेत.त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न,आरोग्य विषयक प्रश्‍न आदिंचा उल्लेख करता येईल.त्यानंतरही काही प्रश्‍न शिल्लक असून त्यासाठी ठोस भूमिका घेऊन पुढील लढयाची दिशा देखील सावंतवाडीत होत असलेल्या या कार्यशाळेत नक्की करण्यात येईल.त्यासाठी परिषदेचे संघटन अधिक सक्षम कसे करता येईल आणि परिषद गाव पातळीपर्यंत कशी नेता येईल यावर विचारमंथन करून या कार्यशाळेत निर्णय घेतले जाणार आहेत.पुढील काळात परिषदेला अधिक गतिशील करण्यासाठी सावंतवाडीची ही कार्यशाळा मैलाचा दगड ठऱणार असल्याने प्रत्येक जिल्हयातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण  नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी आणि कोषाध्यक्ष विजय जोशी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघानं या कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

(महत्वाची टीप ः डिसेंबर महिन्यात गोव्याकडे जाणार्‍या गाडयांना गर्दी असल्यानं रेल्वेचं बुकिंग लगेच करावे.विदर्भातून येणार्‍या पत्रकारांनी मुंबईमार्गे पुढे कोकण रेल्वनं सावंतवाडीला यावे.मराठवाडयातून किंवा पश्‍चिम महाराष्ट्रातूून येणार्‍या पत्रकारांना कोल्हापूरमार्गे येता येईल.जागा मर्यादित असल्याने प्रत्येक जिल्हयातून केवळ सहाच पदाधिकार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यापेक्षा जास्त पदाधिकारी आले तर त्यांची व्यवस्था होणार नाही याची कृपया नोंद ध्यावी.या संदर्भात अधिक माहितीसाठी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्याशी 942436118 या क्रमांकावर संपर्क साधावा.आपण येत असल्याचे गजानन नाईक यांना कळविल्यास व्यवस्थेच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here