चला मुख्यमंत्र्यांचे आभार मानू या

0
1289
 
पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आपण दोन वेळा एस.एम.एस आंदोलन केले.राज्य भरातून 10,000 च्यावर पत्रकारांनी दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांना एसएमएस करून कायदा करण्याची विनंती केली.आपल्या सगळ्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात एकाच दिवशी कायदा मंजुर करून घेतला.आपली 12 वर्षाची मागणी त्यांनी मान्य केली.पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.त्यामुळं मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देणं,त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे.मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धन्यवाद देणं हे सर्वांना शक्य नाही.त्यामुळं एसएमएस पाठवून आपण त्यांना धन्यवाद देऊ यात.
मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की,जास्तीत जास्त पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आभार व्यक्त करावेत.एसएमएससाठी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबर 9373107881 असा आहे.कृपया ,एकाच दिवशी म्हणजे आजच सर्वांनी हे एसएमएस करावेत ही विनंती आहे.
 
आपला
एस.एम.देशमुख
——————————————–
 
एसएमएसमध्ये खालील मजकूर असावा.
.
‘मा.देवेंद्र फडणवीसजी,पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून आपण पत्रकारांना दिलेला शब्द पाळलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार’
 
किंवा इंग्रजीत
Thanks to Shri. Devendra ji Fadnavis, Hon. CM of Maharashtra for keeping his word and getting Journalists Protection Act cleared by both the houses of Maharashtra Legislature.
 
(या मजकुराखाली आपले स्वतःचे संपूर्ण नाव आणि गावाचे नाव लिहावे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here