पाथरीचे पत्रकार माणिक केंद्रे यांच्या दुर्दैवी निधनाने माध्यमातील अभासी जगाचं ला.. भीषण वास्तव समोर आलं.. आयुष्यभर जगाच्या हिताची काळजी वाहणारया पत्रकारावर जेव्हा वेळ येते तेव्हा तो एकटाच असतो हे सत्यही पुन्हा एकदा पण अत्यंत प्रखरपणे जगासमोर आले.. वास्तव वाचून सारं माध्यम जगत सुन्न झालं.. हेलावून गेलं.. पत्रकाराला गरज असते तेव्हा सरकार, समाज आणि व्यवस्थापनही अश्रू पुसायला येत नाही हे जळजळीत सत्य ही आपण पुन्हा एकदा अनुभवलं.. अशा स्थितीत आपणच आपल्या पत्रकार मित्राच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे याची जाणीव अनेकांना झाली आणि माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शेकडो हात पुढे आले.. आर्थिक मदतीचं आवाहन करणारी पोस्ट मी दुपारी दोन वाजता टाकली आणि नंतर अवघ्या चार तासात एक लाख रूपयांची मदत केंद्रे यांच्या मुलीच्या खात्यात जमा झाली.. पुढील दोन दिवसात अडीच तीन लाख रूपये जमा झाले.. महाराष्ट्रात हे प़थमच घडत होते.. ही नक्कीच चांगली आणि आपल्या सगळ्यांना बळ, हिंमत देणारी गोष्ट असली तरी प्रत्येक वेळी अशी मदत होईलच असं नाही… त्यामुळे यावर कायमस्वरूपी इलाज करावा लागेल..त्यासाठी दोन तीन पर्याय आहेत..महाराष्ट्र सरकारची शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याजना केंद़ सरकारच्या पत्रकार योजनेच्या धर्तीवर राबवावी अशी आपली मागणी आहे.. म्हणजे या योजनेतून मदत मिळविण्यासाठी जी अधिस्वीकृतीची अट लादलेली आहे ती रद्द करावी असा आपला आग्रह आहे.. त्यासाठी काल दिवसभर मी, किरण नाईक, शरद पाबळे यांनी धावाधाव केली.. अधिकारी नेहमी प्रमाणे डाळ शिजू देत नाहीत..आता मुख्यमंत्र्यांना भेटूनच सारं दु:ख त्यांच्या कानावर घालावे लागेल.. सुदैवानं मुख्यमंत्री संवेदनशील आहेत त्यामुळे राज्यातील बहुसंख्य पत्रकारांचं दुःख ते समजून घेतील आणि आपल्याला न्याय देतील असा विश्‍वास आहे.. न्याय नाही मिळाला तर पुन्हा सनदशीर मार्गानं लढा ऊभारावा लागेल..केंद़ सरकारच्या या योजनेत अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना देखील मदत मिळते.. मात्र तो पत्रकार 1955 च्या श्रमिक पत्रकार कायद्याच्या व्याख्येत बसत असला पाहिजे आणि त्यानं सलग पाच वर्षे पत्रकार म्हणून काम केले पाहिजे.. यामध्ये साप्ताहिकाचे पत्रकार, स्वतंत्र व्यवसायी पत्रकार, रिपोर्टर येतात.. म्हणजे ही सर्व समावेशक योजना आहे.. ती महाराष्ट्रात लागू झाली तर बहुसंख्य पत्रकारांना याचा लाभ मिळू शकेल.. मात्र अधिकारी याला खोडा घालताना दिसतात.. ठराविक पत्रकार, ठराविक आजार, ठराविक रक्कम असेच पत्रकार कल्याण निधीचे स्वरूप असल्याने व्याजातून आलेले काही कोटी रूपये या कल्याण नि़धीत तसेच पडून आहेत.. अधिस्वीकृतीची अट रद्द करून घेण्यासाठी पुढील काळात आपल्याला सरकारवरचा दबाव वाढवावा लागेल..अर्थात हे सारं होत राहिल पण केवळ सरकारच्या नावानं गळे काढून काही होणार नाही.. आपणही आपल्यासाठी काही करावं लागेल.. राज्यातील ३५४ तालुका पत्रकार संघ आणि मुंबईसह ३६ जिल्हा पत्रकार संघांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांना मदत करता यावी असा एक कायमस्वरूपी निधी उभारला पाहिजे.. प्रत्येक तालुक्याने किमान 11 लाख रूपये आणि जिल्ह्याने 25 लाख रूपये उभे करून ते जर मुदती ठेव योजनेत ठेवले आणि मिळणारया व्याजातून गरजू पत्रकारांना मदत केली तर कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.. त्यासाठी स्वतंत्र पत्रकार मदत निधी या नावानं वेगळा ट्रस्ट स्थापन करावा आणि तालुक्यातील आ़णि जिल्हयातील विश्वासपात्र पत्रकारांचा त्यामध्ये समावेश करावा..हा ट्रस्ट पूर्णतः तालुका,जिल्हा संघ आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आणि अंकीत राहिल..दर तीन वर्षांनी विश्‍वस्त मंडळ बदलंलं जावं. .. आणि दोन टर्मचया वर कोणालाही ट़सटवर काम करण्याची संधी दिली जाऊ नये.. नागपूर श्रमिक पत्रकार संघ असेल किंवा परिषदेशी संलग्न काही जिल्हा संघांनी हा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी देखील झाला आहे.. मराठी पत्रकार परिषद राज्यपातळीवर  असा प्रयत्न करणार आहे.. त्यासाठी परिषदेची येत्या २२ मार्च रोजी मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे.. हे काम युद्धपातळीवर करावे लागणार आहे.. तालुका, जिल्हा पातळीवर निधी जमवताना प्रत्येक पत्रकाराला सवत:चं योगदान दयावं लागेल.. जे हे योगदान देतील त्यांनाच ही मदत मिळेल अशी व्यवस्था करावी लागेल..आणखी एक मार्ग आम्ही शोधतो आहोत.. गरजू नागरिकांना मदत करणारया अनेक स्वयंसेवी संस्था मुंबईत आहेत.. आपल्यापैकी बहुतेकांना त्याची माहिती नसते.. मलाही नाही.. पण या मार्गानं देखील गरजू पत्रकारांना मदत होऊ शकते.. काल विधान भवनात मित्रवर्य मंगेश चिवटे भेटले.. पुरवाश्रमीचे पत्रकार असलेले चिवटे सध्या शिवसेनेच्या आणि मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचं काम करतात.. या कक्षाचं काम कसं चालतं हे समजून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर मुद्दाम मी आणि परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे शिवसेना भवनात गेलोत . असंख्य गरजू लोकांना शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षानं केलेली मदत पाहून थक्क झालो.. मंगेश चिवटेच नाही तर त्यांच्याबरोबर काम करणारे स्वरूप आणि अन्य टीम अत्यंत तळमळीनं हे काम करताना दिसले.. ‘या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू पत्रकारांना देखील आम्ही मदत करू शकतो’ असं मंगेश चिवटे यांनी सांगितल्यानंतर पत्रकारांसाठी हा एक नवा पर्याय समोर आला आहे..चिवटे आणि टीमचा मुंबईतील विविध रूगणालयांशी संपर्क असतो.. त्यामुळे कोणताच अडथळा येत नाही.. ज्यांना शिवसेना मदत कक्षातून मदत हवी आहे त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचा संदर्भ देऊन मंगेश चिवटे किंवा शिवसेना मदत कक्षाशी संपर्क साधल्यास पत्रकार मित्रांना सर्वप्रकारची मदत मिळू शकेल.. त्यासाठी खालील फोन नंबर्सवर संपर्क करता येईल..
मंगेश चिवटे9665951515022-24398202तसेच82759030309423902525पत्ता :शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेना भवन, दादर (प.) मुंबई 28
मुंबईत इतरही काही संस्था आहेत.. आम्ही या संस्थांबरोबर देखील संपर्क करीत आहोत.. भविष्यात पैसे नसल्याने उपचार घेता आले नाहीत अशी वेळ राज्यातील कोणत्याही पत्रकारावर येणार नाही याची काळजी आम्ही आणि आपण सारे मिळून घेणार आहोत… या कार्यात आम्हाला आपली साथ नेहमी प्रमाणे हवी आहे… ती मिळेल ही अपेक्षा..
आपला 

*एस.एम.देशमुख*

1 COMMENT

 1. एसेम सर नमस्कार
  आपण जे पत्रकारा साठी सदोदित प्रयत्नशील राहता त्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांच्या अडीअडचणीला धावून येतात त्यांना रात्रंदिवस मदत करतात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
  आभार मानणार नाही कारण ते कृतघ्नपणाचे ठरेल
  सर आपण जे निर्णय घेत आहात अतिशय चांगले आहेत आम्ही सर्व पत्रकार बीड जिल्हाच नव्हे तर सर्वच आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत
  राजकुमार बोरगावकर
  संपादक समयसाक्षी
  किल्ले धारूर जिल्हा बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here