पेणचे भूदान चळवळीचे प्रणेते व गागोदे गावाचे सुपूत्र असलेले आचार्य विनोबा भावे यांच्या ग्रामदान मंडळाची १८ फेब्रुवारी २0१२ रोजी झालेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया अवैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे यांनी १ सप्टेंबर रोजी दिल्याने या निवडणूक प्रक्रीया राबविणारे तत्कालीन तहसिलदार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक निर्णय अधिकार्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या दबावाखाली ही निवडणुकीचा निर्णय घेवून ग्रामदानाची प्रक्रियाच उध्वस्त केल्याचा घणाघाती आरोप ग्रामदान मंडळाने माजी अध्यक्ष मारुती पडवल यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जैन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी केला आहे.
गागोदे गावाची निवडणूक ग्रामदानात सहभागी असलेल्या व ज्यांनी जमीनी ग्रामदानास दान केलेल्या सहभागी अशा सभासदाना मतदान करण्याचा अधिकार मिळतो. २0१२ च्या फेब्रुवारी महिन्यात १८ तारखेला ग्रामस्थाच्या म्हणण्याप्रमाणे पात्र मतदाराना मतदानासाठी खुल्या मैदानात मतदान स्थळावर घेण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी विद्यमान अध्यक्ष समीर पाटील यांच्या गटाला झुकता माप देवून निवडणूक प्रक्रीया सुरु केली. या शिवाय ग्रामदानाचे सदस्य नसलेल्या समीर पाटील यांची उमेदवारी अर्जावर विरोधी गटाचे उमेदवार भरत मोरु महाडीक यांचा आक्षेप निवडणूक अधिकार्यांनी पाळला नाही. यामुळे १८ फेब्रुवारीला महाडीक गटाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला व न्यायाची मागणी केली होती. मात्र निवडणूक अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांनी त्या दिवशीची निवडणूक रद्द करुन ती दुसर्या दिवशी १९ फेब्रुवारीला घेतली. त्यामुळे विरोधी गटाने या निवडणूक अवैध असल्याची मागणी करीत त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे समीर पाटील गटाला या निवडणुकीत विजय मिळाला होता. या विरोधात विरोधी गटाचे उमेदवार भरत महाडीक यांनी गेली दोन वर्ष न्यायालय, कमिशनर व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या विरोधात दाद मागण्यासाठी खेटे घातले. मात्र राजकीय दबावामुळे हा वाद पुढे पुढे सरकत होता. अखेर याकामी गागोदे ग्रामस्थानी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोरशेठ जैन यांच्याशी याबाबत समस्यामार्गी लावण्याचे काम सोपवले