गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन आता मनरेगातूनः जयकुमार रावल
अलिबागः मनरेगातून गड किल्लयांचे जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आज रायगड किल्ल्यावर केली.किल्ले रायगडावरील हत्तीखाना परिसरारत आज दुर्ग परिषदेचे आयोजन करणअयात आले होते या परिषदेला रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी यावेळी ‘अभिमान महाराष्ट :गड किल्ले संवर्धन मोहीम’ योजनेची देखील घोषणा केली.या योजनेतून गड किल्ल्यांचे संवर्धन ही लोकचळवळ होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे,राज्यसभा सदस्य तथा रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे,सास्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY