कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कोल्हापूर जिल्हा रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने काल कोल्हापुरात पत्रकार संरक्षण कायदा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.जिल्हयाच्या तेरा तालुक्यातून 300च्या वर पत्रकार शिबिरास उपस्थित होते.महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पेन्शनचा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्‍वासन दिलंय,तसंच पत्रकार भवन आणि पत्रकार गृहनिर्माणच्या प्रश्‍नांवरही विचार करण्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.एस.एम.देशमुख यांचं मुख्य मार्गदर्शन झालं.यावेळी किरण नाईक,समीर देशपांडे,निर्मळे आदिंची भाषणं झाली.यावेळी पुणे विभागीय सचिव शरद पाबळे आणि पुणे शहर सचिव सुनील वाळुंज उपस्थित होते.कार्यक्रमास दीड तास उशिर झाला तरी सर्व पत्रकार थांबले होते.बेळगावची मंडलीही आली होती.कोल्हापूर जिल्हयातील पत्रकार संघटीत होत नाहीत याची खंत होती.कालच्या उपस्थितीने ती दूर झाली.ते ही आता संघटीत होत असून मराठी पत्रकार परिषदेच्या झेंडयाखाली ते एकत्र येत आहेत.जिल्हयातील पत्रकारांचे आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here