माध्यम समुहातील पेडन्यूजचे कारनामे सप्रमाण प्रकाशात आणून देशभर धमाका उडवून देणार्या कोब्रापोस्टला आता इंडिया टुडेने कोर्टात खेचण्याची तयारी चालविली आहे.इंडिया टुडेने कोब्राला नोटीस पाठवून संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ पोर्टलवरून हटविण्यास सांगितले आहे.असं केलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी इंडिया टुडेने दिली आहे.कोब्रानं ही नोटीसही आपल्या पोर्टलवर टाकली आहे.
कोब्रापोस्ट 25 मे रोजी एक पत्रकार परिषद घेऊन आपलं स्टिंग पत्रकाराना दाखविणार होती.तत्पुर्वीच भास्कर ग्रुपनं कोर्टात धाव घेऊन या पत्रकार परिषदेवर मनाई हुकूम आणला.त्यामुळं पत्रकार परिषद झाली नाही आणि भास्करच्या स्टिंगची स्टोरी देखील कोब्राला दाखविता आलेली नाही.
याच पध्दतीनं बंगळुरूच्या कोर्टाच्या ओदशान्वये सुवर्णा न्यूज चॅनल संबंधित स्टोरी देखील कोब्रापोस्टला आपल्या पोर्टलवरून काढावी लागली आहे.त्यामुळं आता भास्कर आणि सुवर्णा न्यूजचे स्टिंग कोर्टाचे विषय संपल्यावर दाखविले जातील असं कोब्रानं स्पष्ट केलंय.आता