व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्याचं प्रकरण गंभीर आहे.व्हॉटस्अ‍ॅपनंच हे जाहीर केलं असलं तरी किती पत्रकारांना टार्गेट केल होतं आणि त्यामागे कोणाचे हात आहेत हे मात्र जाहीर केलं गेलं नाही.इस्त्रायली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून हॅकर्सकडून ही हेरगिरी केली गेली.त्यासाठी 1400 लोकांचे फोन हॅक करण्यात आले.त्यामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर राजकीय विरोधकांचा आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असल्याने विरोधी पक्ष खवळले आहेत.कॉग्रेसनं यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेची झोड उठविली आहे.सुप्रिम कोर्टानं लक्ष घालावे अशी मागणी कॉग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.सुरजेवाला म्हणाले,आपल्याच नागरिकांसोबत आरोपीप्रमाणे व्यवहार करणारे हे सरकार .
दरम्यान या प्रकरणी व्हॉटसअ‍ॅपनं 4 नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यावंं अशा सूचना केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY