कोकणात प्रस्थापितांना धक्के बसणार

0
833

नल्सनच्या पोलमध्ये कोकणातील पंधरा जागांपैकी तेरा ठिकाणी शिवसेना निवडून येणार असा अंदाज व्यक्त केला आहे.एका ठिकाणी कॉग्रेस आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी येईल असं नल्सनचं म्हणणं आहे.याचा अर्थ रायगडमध्ये शेकापला एकही जागा मिळत नाही,भाजपची प्रशांत ठाकूर,आणि कणकवलीच्या प्रमोद जठार किंवा गुहागरची विनय नातू यांचीही जागा येत नाही,राष्ट्रवादीची एक कोणती जागा येणार चे समजत नाही. अवधूत तटकरे यांची श्रीवर्धनची,सुरेश लाड यांची कर्जतची,की गुहागरची भास्कर जाधव यांची.या तीनही जागा प्रतिष्ठेच्या आहेत.नेल्सनच्या म्हणण्यानुसार कॉग्रेसला कोकणात एकच जागा मिळतेय.ती कुठली असेल नारायण राणे यांची कुडाळची,नितेश राणे यांची कणकवलीची,रवी पाटील यांची पेणची की माणिक जगताप यांची महाडची..सांगता येत नाही.
मात्र या एक्झीट पोलनं संभ्रम असा निर्माण होतोय की,पनवेलमध्ये जर भाजपची प्रशांत ठाकूरची जागा आली नाही तर ती सेनेला नक्कीच जाणार नाही.ती गेली तर शेकापच्या बाळाराम पाटलांनाच जाईल.पण पोलमध्ये शेकाप आणि भाजपच्या वाट्याला नारळ दाखविला गेलेला आहे.पेणमध्ये देखील तसंच आहे.तिथं कॉग्रेसचे रवी पाटील येणार नसतील तर शेकापचे धैर्यशील पाटीलच येतील.तळ कोकणातील नारायण राणे यांची जागा आली तर मग रवी पाटील येत नाहीत असं एक्झीट पोल सांगतो म्हणजे पेणला शेकाप येणार.पण शेकापच्या वाट्याला तर पोल मध्ये जागाच दाखविलेली नाही.अलिबागमध्येही शिवसेना आणि शेकापमध्ये कॉंटे की टक्कर आहे.तिथं सेना आली नाही तर शेकाप येणार आहे.मला वाटतं लोकसभा निवडणुकातील निकाल डोळ्यासमोर ठेऊन हा एक्झीट पोलचा निष्कर्ष काढलेला दिसतोय.लोकसभेच्या वेळेस शेकाप स्वतंत्र लढला,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी युती झाली होती असं असतानाही शिवसेनाचे अनंत गीते विजयी झाले.त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होईल असा अंदाज नेल्सनने काढलेला दिसतो आहे.रायगडमधील अनेकांशी बोलल्यानंतर असं अनुमान करता येईल की,,कोकणात सर्वाधिक जागा शिवसेनेला येणार आहेत..आणि शिवसेनेच्या या झंझावातात प्रस्थापित आणि दलबदलू तसेच जनतेला गृहित धरून राजकारणाचा धंदा कऱणाऱ्यांना धक्का बसणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here