यदाच्या पावसाळ्यात कोणतीही मोठी आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी पावसाळ्यात ठाणे येथे तैनात करावी अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल कोकण भवन येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचे अंदाज लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागांनी मे च्या अखेरीस सराव शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.कोकण रेल्वेच्या मार्गावर 64 धोकादायक ठिकाणे असून तेथे योग्या त्या उपाययोजना केल्या जात आहेत.तसेच कोकणातील पाच जिल्हयातील 373 गावे पूरप्रवण रेषेत आहेत तर 207 गावे दरडग्रस्त म्हणून नोंदविले गेले आहेत.तेथेही योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले गेले आहेत.यंदाच्या पावसाळ्यात 5,,6.7 जून,4,5,6 जुलै,20 ,21 ऑगस्ट,आणि 18 सप्टेंर या काळात साडेचार मीटरपेक्षा जास्त उचीच्या लाटा उसळणार असल्याने या काळातही विशेष काळजी घेतली जाणार आहे.पावसाळ्यात अधिकार्यांनी आपले मोबाईल बंद ठेवल्यास किंवा पूर्ण परवानगी न घेता मुख्यालय सोडल्यास संबंधित अधिकार्यावर योग्य ती कारवाई कऱण्याचे सूतोवाचही तानाजी सत्रे यांनी केले आहे.