मंडल निरिक्षकाने केज येथील एका पत्रकारास शिवराळ भाषा वापरली.. संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली गेली. उपयोग झाला नाही.. शहरातील पत्रकारांनी एकजूट दाखवत तहसिलसमोर उपोषण सुरू केले बसले..ही बातमी मला समजताच मी लगेच केजला पोहोचलो.. मंडळ निरिक्षकाने पत्रकारांची माफी मागितली.. प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन दिले.. एकजुटीमुळे लढा यशस्वी झाला.. त्यानंतर माझ्या विनंतीवरून पत्रकारांनी उपोषण मागे घेतले.. माझ्या समवेत परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे, पत्रकार अतूल कुलकर्णी आदि होते..