राज्य सरकारने देखील केंद्राच्या धर्तीवर
मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य करावे
एस.एम.देशमुख यांची मागणी

मुूंबई ः केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील कोविड-19 ने मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी एस.एम.देशमुख यांंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे..
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की,कोरोनानं मृत्युमुखी पडणार्‍या पत्रकाराच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने पाच लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे,,त्याच धर्तीवर राज्य सरकारने देखील मृत झालेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत करावी..राज्यात जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 61 पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे.600 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झालेले होते.पत्रकारांच्या कामाचे स्वरूप बघता हा वर्ग आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच पोलिसांप्रमाणेच हायरिस्क कॅटगिरीत येत असल्याने सरकारने लस देताना पत्रकारांचा प्राधांन्याने विचार करावा तसेच मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांचे आथिक सहाय्य करावे अशी मागणी पत्रात केली गेली आहे.केंद्र सरकारची योजना वेळ खाऊ असल्याने राज्य सरकारने नोडल एजन्सी म्हणून काम करावे आणि राज्यातील पत्रकारांना केंद्र सरकाचे आर्थिक सहाय्य लवकर कसे मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी देखील पत्रात करण्यात आली आहे.
या पत्रावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here