67 दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्राची 5 लाखांची मदत

नवी दिल्ली : भारत सरकारला धन्यवाद द्यावे लागतील.. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या press information bureau च्या वतीने journalist welfare scheme अंतर्गत देशातील 67 दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.. JWS च्या बैठका दर आठवड्याला घेण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला..भारत सरकारच्या या निर्णयाबददल एस.एम.देशमुख यांनी सरकारचे आभार मानले आहेत..
महाराष्ट्रात 135 पत्रकारांचे कोरोनानं बळी गेले आहेत. ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांच्या नातेवाईकांनी किंवा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनी पुढाकार घेऊन पीआयबी कडे अर्ज करण्याचे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे..
केंद़ सरकारच्या 67 जणांच्या या यादीत महाराष्ट्रातील किती दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना ही मदत मिळाली ते समजू शकले नाही..
(खालील बेवसाईटवर जाऊन सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना मिळविता येईल)
https://accreditation.pib.gov.in/jws/default.aspx

Journalists and their families can apply for assistance under the Journalist Welfare Scheme (JWS) through the PIB website. 👆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here