कारागृहातील कैद्यांसाठी गांधी शांती परीक्षेचं आयोजन
‘गुन्हयांचा व्देष करा,गुन्हेगारांचा नाही कारण गुन्हेगारांचं ह्रदयपरिवर्तन शक्य आहे’,असं महात्मा गांधी म्हणत,याच विचारांचा आधार घेत हिंसामुक्त समाजरचनेचे व्रत घेतलेल्या मुंबई येथील सर्वोदय मंडाळातर्फे अलिबाग जिल्हा कार्यालयातील 35 कैद्यांसाठी नुकतेच गांधी शांती परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं.या परीक्षेत गांधीजींच्या पुस्तकांवर आधारित प्रश्‍न विचारले गेल.सर्वोदय मंडळ गेली बारा वर्षे विविध कारागृहात गांधी शांती परीक्षेचं आयोजन करीत आहे.यावर्षी अलिबागसह  बारा तुरूंगात अशी परीक्षा घेण्यात आली.त्यात हजारांवर कैद्यांनी भाग घेतला..”कैद्यांमध्ये पश्‍चातापाची भावना निर्माण करणंं,त्यांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब कऱण्यास प्रवृत्त करणं,कारागृहा बाहेर पडल्यानंतर एक जबाबदाार नागरिक म्हणून जीवन व्यतित करण्यास सक्षम बनविणं , गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणं हे गांधी शांती परिक्षेचे मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलं.कैद्यांना गांधीजींच्या मुल्यांची ओळख करून देण्यासाठी लक्ष्मण गोळे यांचे व्याख्यानंही आयोजित केलं गेलं होतं.परीक्षेत उत्तीर्ण पहिल्या तीन कैद्याना बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आलं.यावेळी कारागृह अधिक्षक नागनाथ जगताप आणि सर्वोदयचे सचिव सचिन गुरव याचं मार्गदर्शनही लाभलं ः

LEAVE A REPLY