Monday, May 17, 2021

कायदा झाल्यामुळे पत्रकारांवरील हल्ले घटले :एस.एम.

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांच्या आरोग्यसाठी वैद्यकीय विमा पॉलिसी सुरू करावी!- *मा एस एम देशमुख* पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांवरील हल्ले कमी झाले!देशमुख यांची माहिती* (पिंपरी,दि 20, प्रतिनिधी) पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या आरोग्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (मेडिक्लेम)सारखी वैद्यकीय पॉलिसी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांनी काल पिंपरी येथे केली. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी 12 वर्षे आंदोलने करून संरक्षण कायदा मंजूर करून घेतल्याबद्दल मा एस एम देशमुख यांचा व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील पत्रकार कक्षात संपन्न झाला.यावेळी पिंपरी महापालिकेच्या महापौर मा उषा उर्फ माई ढोरे,उपमहापौर मा तुषार हिंगे,स्थायी समिती सभापती मा विलास मडेगिरी,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मा शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव मा बापूसाहेब गोरे व पुणे जिल्ह्यातील पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मा एस एम देशमुख यांचा स्मृतिचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन महापौर मा माई ढोरे यांच्या शुभेहस्ते सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,परिषद प्रतिनिधी एम जी शेलार,जिल्हा समन्वयक व हवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उर्फ नाना जगताप,सरचिटणीस सतिश सांगळे, कोषाध्यक्ष मनोहर तावरे,कार्यकारिणी सदस्य,बाबा तारे,दादाराव आढाव,शिरूर तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संजय बाराहाते, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यास उत्तर देताना मा एस एम देशमुख म्हणाले की ” पत्रकारांना पेन्शन व संरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने झाली व मागील महिण्यात पत्रकार संरक्षण कायद्यावर शिक्का मोर्तब झाले त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यामुळेच गेली 15 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात सत्कार समारंभ आयोजित होत आहेत. पत्रकारांसाठी संरक्षण कायदा मंजूर झाला याचे श्रेय महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे आहे.हा लढा मंजूर करण्यासाठी पनवेल ते वर्षा बांगला चार चाकी गाड्यांची रॅली,घंटानाद आंदोलन,आमदार खासदार यांच्या सह्याची मोहीम,काळ्या पट्ट्या बांधून निषेध,वर्तमानपत्रामध्ये निषेध,म्हणून काळ्या रंगाची चौकट छापणे इत्यादी विविध आंदोलने केली.यासर्व आंदोलनामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य व राज्यातील बहुसंख्य पत्रकार व संपादकांनी सहभाग नोंदविला त्यामुळेच हा कायदा राज्यसरकारला मंजूर करावा लागला.पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाल्याने पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी झाले आहे. मा एस एम देशमुख पुढे म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील सर्व घटकासाठी काम करतेय,पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक आहे त्यामुळे शहरात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मेडिक्लेम सारखी आरोग्य पॉलिसी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी महापौर सौ माई ढोरे,उपमहापौर तुषार हिंगे व स्थायी समिती सभापती विलास मडेगीरी यांच्याकडे केली आहे. यावेळी मा एस एम देशमुख यांच्या पत्रकारांच्या आरोग्य पॉलिसी बाबत तत्वतः मान्यता देऊन यासाठी आवश्य पुढाकार घेऊ असे आश्वासन तिन्ही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे,जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर,माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडघुले यांनी व सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी केले तसेच आभार सरचिटणीस मारुती बाणेवार यांनी मानले.

Related Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,961FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...
error: Content is protected !!