कल्पक हातवळणे स्वतःच्या ‘पायावर’ उभा राहिला…

2
1062

kalpak-1kalpak4 पत्रकारांच्या एकजुटीने घडविला  चमत्कार 

  कल्पक हातवळणे स्वतःच्या ‘पायावर’ उभा राहिला,

  शंकर साळुंकेवर उपचार सुरू झाले

मराठी पत्रकार परिषदेचा पुढाकार,आपल्या सर्वांची खंबीर साथ,आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे तसेच नितीन जाधव यांनी दाखविलेली संवेदनशीलता यामुळे नगरचा दीव्य मराठीतील छायाचित्रकार कल्पक हातवळणे आज आपल्या पायावर उभा असून वडवणी तालुक्यातील पत्रकार शंकर साळुंके पुण्याच्या येरवडा येथील मनोरूग्णालयात उपचार घेऊ लागला आहे.दोन चांगली काम आपल्या सर्वाच्या मदतीनं मला करता आली म्हणून आज मी प्रचंड खुष आहे.

काल नाशिकहून परतत असताना कल्पक हातवळणेचा फोन आला.अगदी सद्दगदीत होऊन बोलत होता.’सर,तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावेत हेच कळत नाही,तुम्ही मला माझ्या पायावर उभं केलंत’ असं तो सांगत होता.तो बोलत असताना माझ्याही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.काय बोलावं मलाही सूचत नव्हतं.’बरं झालं म्हणत’ मी फोन टेवला.

कल्पक हा नगरच्या दीव्य मराठीत छायाचित्रकार म्हणून कार्यरत होता.अचानक त्याच्या पायाला मार लागला.इन्फेक्शन झालं आणि नंतर पाय तोडावा लागला.छायाचित्रकाराची नोकरी फिरती असल्यानं पायाबरोबरच त्याला आपली नोकरीही गमवावी लागली.नवा पाय बसवायचा तर तीन ते सव्वा तीन लाख रूपये खर्च होता.एक प्रेस फोटोग्राफर एवढी रक्कम उभी करू शकत नव्हता.त्यामुळं सात-आठ महिने तो कुबडया घेऊनच घरातल्या घरात वावरत होता.मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागाच्या चिटणीस मिनाताई मुनोत,तसेच मन्सूरभाई,मटाचे विजयसिंह होलम  यांनी ही बातमी मला सांगितली.मी मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची भेट घेतली.सारी वस्तुस्थिती त्यांना सांगितली.कल्पक स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे असा आग्रह धरला.नंतर लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता केली.त्यानंतर अवघ्या आठ-दहा दिवसात जवळपास पावणेदोन लाखांची मदत कल्पकला मिळाली.त्याच वेळेस मी फेसबुकवर कल्पकची कहाणी मांडल्यानंतर अनेकांनी उदारपणे कल्पकच्या खात्यावर रक्कम जमा केली.असे सारे मिळून दोन -सव्वा दोन लाख रूपये जमा झाले .त्यात कल्पकने काही नातेवाईकांकडून एक लाखाची भर घालून 1 तारखेला कृत्रिम पाय बसवून घेतला.काल कल्पक सांगत होता,’आता मी कुबडया न वापरता फिरू शकतो,एवढेच नव्हे तर मोपेडही चालवू शकतो’.सर्वांची मदत मिळाल्याने कल्पक आज पुन्हा स्वतःच्या पायावर उभा असला तरी दिव्य मराठीतली त्याची नोकरी गेल्याने आता त्याला पर्याय शोधावा लागणार आहे.पाहू यात त्यातूनही काही मार्ग काढता येतो का ते…

रविवारी आमचे पुण्यातील अधिवेशन संपले आणि सोमवारी सकाळीच शंकर साळुंकेला घेऊन त्याचे बंधू पुण्याला आले.मागच्या घेपेला काही कागदपत्रे मिळाली नसल्याने त्यांना परत जावे लागले होते.त्यानंतर माजलगावच्या कोर्टातून ऑर्डर मिळाली आणि शंकरला पुन्हा पुण्याला आणले गेले.सोमवारी आम्हाला कार्टात काम होते आणि त्यानंतर नाशिकला जायचे shankarअसल्याने मला तर येरवडयात जाता  आले नाही पण माझे सहकारी सुनील वाळुंज आणि दिलीप कुर्‍हाडे यांनी मनोरूग्णालयात जाऊन शंकरला अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था केली.त्याच्यावर आता तेथे उपचार सुरू झाले आहेत.

वेगवेगळ्या दैनिकात  उपसंपादक म्हणून काम केलेला शंकर तीन-चार वर्षांपासून बेकार होता.एम.ए झालेला आणि आयएएस होण्याची स्वप्न बघणार्‍या शंकरवर बेकारीची वेळ आल्याने त्याचा त्याच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला.प्रकृत्ती बिघडत गेली.वडिल नाहीत.लग्न झालेलं नाही.भावांकडेच वास्तव्य.भावांची परिस्थितीही दुपारची भा्रंत अशीच.त्यामुळं योग्य वेळी त्याच्यावर उपचार झालेच नाहीत.त्याचा विपरित परिणाम झाला आणि अंतिमतः त्याला येवरडयाच्या मनोरूग्णालायात दाखल कऱण्याची वेळ आली.त्याच्यासाठी अनेकांनी सढळ हस्ते मदत केली..त्यातून काही रक्कम दोन वेळच्या वडवणी-पुणे प्रवासासाठी आणि नंतर अ‍ॅडमिट करताना काही रक्कम दिली.यापुढे आता दरमहा सातशे रूपये रूग्णालायत जमा करावे लागणार आहेत.त्यामुळे जी रक्कम शिल्लक आहे ती,यासाठी वापरली जाईल.त्यातूनही जी रक्कम उरेल ती नंतर औषध -गोळ्यासाठी त्याला दिली जाईल.तोपर्यंत शिल्लक रक्कम मराठी पत्रकार परिषदेच्या खात्यावर जमा केली जाईल.त्यातून त्याचा खर्च भागविला जाईल.या आजारातून तो नक्की बरा होईल आणि परत नव्या उमेदीने कामाला लागेल याची खात्री आहे.

  आपल्या सर्वांच्या मदतीमुळे शंकरवर उपचार सुरू करता आले.या कामी ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.सरकारी मदतीवर अवलंबून न राहता पत्रकार मित्रांच्या मदतीसाठी पुढे येणार्‍यांची संख्या वाढत आहे हे आपल्या चळवळीचे खरे यश आहे असे मला वाटते.कल्पक आणि शंकर या दोघांची आयुष्ये परत पहिल्यासारखी सुरू व्हावीत ही मनोकामना आणि शुभेच्छा ( एस.एम.)

2 COMMENTS

  1. आपले आणि परिषदेचे आभार मानावे तेवढे थोड़े आहेत. यातून बळ मिळते कोणीतरी पाठीशी आहे हां विश्वास येतो आणि आपणही इतरांसाठी झटले पाहिजे फक्त स्वतःच्याच् कोशांत गुंतून पडू नये हेही मनात पक्क् होतं धन्यवाद सर

    शिवराज काटकर सांगली
    9325403226

    • शिवराजजी आपल्या सर्वांच्या बळावरच लढाई सुरू आहे.हाच स्नेह कायम असू द्यावा ही विनंती.

Leave a Reply to S.M. Deshmukh Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here