पत्रकार संरक्षण कायद्यासाठी नागपुरात १२-१२-२०१३ रोज़ी आमरण उपोषण करायचं ठरलं तेव्हा बारा जणांनी नावं दिली.प्रत्यक्ष उपोषण सुरू झालं तेव्हा मी ,किरण नाईक आणि परळीचे एक पत्रकार असे आम्ही तिघेच उपोषणाला बसलो.उपोषणाच्या पहिल्या दिवशी सकाळी पन्नास-साठ पत्रकार होते,तेव्हा ‘लढते रहेंगे,लेते रहेंगे’,’या सरकारचं करायचं काय ? खाली डोकं वरती पाय’,’पत्रकार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या गेल्या.अनेकांनी लंबी चौडी भाषणंही केली.भाषणं केलेली नेते मंडळी भाषण संपलं,बाईट देऊन झालं की,पसार झाली.नंतर उपस्थितांपैकी देखील एक एक सुबल्ल्या करू लागला.उपस्थितांची संख्या हळू हळू रोडावत गेली.जेवणाची वेळ झाली तेव्हा आम्ही दहा-बाराजण मांडवात होतो,चहाच्या वेळेला पाच-सहा जण उरलो,दिवे लागणीला तिघे-चौघेच शिल्लक होते.थंडीचा कडाका वाढल्यानंतर मांडवात मी आणि किरण नाईकचं उरलोत.
.नागपुरातील कडाक्याची थंडी,डासांचा मारा,परिसरात पसरलेली दुर्गंधी अशा वातावरणात आम्ही ती रात्र कशी घालविली ?त्या रात्रीची आमची मानसिकता काय होती ? याची मजेशीर हकिकत वाचा.
.’एक रात्र फुटपाथवरची’.. या प्रकरणात। .
आजच बुक करा
एस एम देशमुख लिखित
कथा एका संघर्षाची..
लवकरच प्रसिध्द होत आहे.
आगाऊ बुकिंग करणारांसाठी 150 रूपयांचे पुस्तक 100 रूपयांस मिळेल.( कुरिअर खर्च वेगळा ) ,पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातही 100 रूपयांंत पुस्तक मिळेल.
इच्छुकांनी सुनील वाळुंज यांच्याशी 9822195297 या क्रमांकावर संपर्क साधावा