औरंगाबादच्या वाळुंज परिसरात आंदोलकांच्या मारहाणीत पत्रकार सुदाम गायकवाड आणि एक पत्रकार जखमी झाले आहेत. सुदाम गायकवाड यांना घाटामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्रकार मित्रांनो,काळजी घ्या..

मध्यंतरी तामिळनाडूत अतिवृष्ठी झाली.कव्हरेजसाठी एका चॅनलची टीम दुर्गम भागात गेली.नदीत होडी उलटली.दोन पत्रकारांना जलसमाधी मिळाली.समाज,सरकार,वाहिनी सार्‍यांनीच हात वर केले.दोघांचीही कुटुंबं रस्त्यावर आली.बर्‍याचदा असंच होतं.टीआरपीच्या मागं लागलेले संपादक आपल्या रिपोर्टर्संना नको ते धाडस करायला भाग पाडतात.त्याच्यावर काही आपत्ती ओढावली तर नामानिराळे राहतात.सर्व वार्ताहरांना विनंती आहे की,कव्हरेज करताना आपली काळजी घेतली पाहिजे.काम करताना आपण देहभान हरवून जातो हे तर खरंच तरीही आता पुर्वीचे दिवस राहिलेले नाहीत.काळजी घेतली नाही तर पश्‍चातापाचीच वेळ येते.अशी अनेक उदाहरणं समोर आहेत.आजही वाळुंजला दोन पत्रकारांवर हल्ले झाले.चाकणमध्येही असे प्रकार घडले होते.आपण आपलं काम करीत असतो तरीही काही मित्र म्हणतात,पत्रकार निर्दोष नसतात,आततायीपणा करतात.फटके खा..वरती बोलणे खा..तेव्हा खरंच वार्ताकनासाठी जाणारांनी काळजी घेतली पाहिजे हे तर खरंच..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here