ओखी वादळाने ओढलेले ओरखडे हळू हळू समोर येऊ लागले असून रायगड जिल्हयातील आंबा पिकाला ओखीचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.अचानक झालेला पाऊस आणि दमट हवामान यामुळे आंबा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याचे शेतकरी सांगतात.त्यामुळं आंबा उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
रायगड जिल्हयात आंबा लागवडीखाली 42 हजार हेक्टर क्षेत्र आहे.त्यातील 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.जिल्हयात दरवर्षी सरासरी 21 हजार मेट्रिक टन आंबा ऊत्पादन होते.मात्र यंदा ओखीचा परिणाम उत्पादनावर होण्याची चिन्हे आहेत.
साधारणतः डिसेंबर-जानेवारीला आब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते.फलधारणा झाल्यानंतर 90 दिवसात आंबा तयार होतेो.अनेक आंबा बागा मोहरानं फुलून गेल्या आहेत तर जेथे चांगली मशागत होते आशा बागांमध्ये फलधारणाही होऊ लागली आहे.मात्र पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे मोहर आणि लागलेली फळं गळायला सुरूवात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.हीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्हयातील आंबा उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.ःः
शोभना देशमुख अलिबाग रायगड–