मुंबई दिनांक 21 ( प्रतिनिधी ) पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांना पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली बारा वर्षे संघर्ष करावा लागला.हा संघर्ष जेवढा रोमहर्षक होता तेवढाच तो पत्रकारांचा अंत पाहणाराही होता.राज्यातील सोळा संघटनांनी एकत्र येत दिलेल्या या लढयातील आठवणी जागविणारे कथा एका संघर्षाची हे एस.एम.देशमुख लिखित पुस्तकाचे येत्या रविवारी नागपूर येथे प्रकाशन होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.रेशीमबागेतील महर्षि व्यास सभागृहात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होत आहे.यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.100 पानांच्या या पुस्तकाची किंमत 150 रूपये असली तरी प्रकाशनस्थळी पुस्तक 100 रूपयांना दिले जाणार आहे.-
एस.एम.देशमुख यांच्या पुस्तकाचे रविवारी नागपुरात प्रकाशन
