राज्यातील छोटया आणि मध्मय वृत्तपत्रांचा एल्गार मेळावा 1 सप्टेंबर रोजी औढा नागनाथ येथे होत आहे.सकाळी साडेदहा वाजता मेळाव्यास सुरूवात होईल.एस.एम.देशमुख मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी स्थानिक खासदार राजीव सातव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक हे देखील मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी गेली पन्नास वर्षे अत्यंत सचोटीनं पत्रकारिता करणार्‍या वृत्तपत्रांच्या मालकांचा आणि संपादकांचा खा.राजीव सातव यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.दुपारी एक वाजेपर्यंत हा मेळावा चालणार असून मेळाव्यात पुढील दिशा नक्की करण्यात येईल.तसेच हा लढा पुढे नेम्यासाठी प्रमुख पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी असलेली एक समिती नेमण्यात येईल.
मेळावा संपल्यानंतर दुपारी 1 ते 2 जेवणाची विश्रांती घेतली जाईल.
दुपारी 2 ते 4 या वेळात मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होईल.या बैठकीस पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आणि परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.या बैठकीत परिषदेची पुढील दिशा नक्की केली जाईल.बैठकीत एस.एम.देशमुख यांच्या हस्ते पाटण तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे.पाटण तालुका पत्रकार संघानं तालुका अध्यक्षांच्या मेळाव्याचं उत्तम नियोजन केलं होतं.त्याबद्दल हा सत्कार केला जाणार आहे.चार पर्यंत ही बैठक संपेल.
परभणी हिंगोली रोडवर औढा नागनाथ आहे.औरंगाबादहून रस्ता मार्गे औढ्याला येता येते.रेल्वेनं येणार्‍यांनी परभणीस उतरावे.परभणीहून औढा नागनाथ पन्नास किलो मिटर अंतरावर आहे.औढयाला जायला प्रत्येक दहा मिनिटाला बस आहेत.
दरम्यान मेळाव्याची जयंत तयारी नंदकिशोर तोष्णीवाल आणि विजय दगडू यांच्या मार्गदर्शनाखली स्थानिक पदाधिकारी करीत आहे.मेळाव्यास आणि कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here