त्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी

प्रथमच 15 पत्रकार संघटना एकत्र,15 जानेवारीला मोठे आंदोलन

भोपाळः
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेर्तृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायद्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी अभूतपूर्व लढा दिला.त्यानंतर मागील एप्रिलमध्ये महाराष्ट्र सरकारनं ‘पत्रकार संरक्षण कायदा’ मंजूर केला.हा कायदा झाल्यानंतर राज्यातील पत्रकारांच्या हल्ल्यांत गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याचं वास्तव समोर आल्यानंतर आता अन्य राज्यातील पत्रकार संघटनांनी देखील पत्रकार संरक्षण कायद्यासाठी उचल खाल्ली आहे.दिल्ली.युपी,केरळ,बिहारसह अनेक राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी होत असतानाच आता मध्यप्रदेशमधील पत्रकारांनी कायद्यासाठी चलो भोपाळचा नारा दिला असून राज्यातील पंधरा संघटना प्रथमच एकत्र येत 15 जानेवारी रोजी भोपाळमध्ये मोठे आंदोलन करीत आहेत.एस.एम.देशमुख ,किरण नाईक देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत.
महाराष्ट्रात पत्रकारांच्या विविध 16 संघटनांनी एकत्र येत मोठं आंदोलन उभं केलं होतं.याच धर्तीवर आता मध्यप्रदेशमध्येही 15 पत्रकार संघटना एकत्र येत असून कायद्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे.त्यासाठी जिल्हया-जिल्हयात पत्रकारांनी 15 च्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं यासाठी पत्रकारांना आवाहन केले जात आहे.मालवा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पाठक यांनी यासंदर्भात सांगितले की.’राज्यात सातत्यानं पत्रकारांवर हल्ले होत आहेत,ते रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी सात्तत्यानं आम्ही करीत असलो तरी सरकार त्याकडं दुर्लक्ष करीत आहे.ही मागणी संघटीतपणे करण्यासाठी 15 जानेवारी रोजी सर्व पत्रकार भोपाळमध्ये जमा होत आहेत.राज्यात हल्ल्यांबरोबरच खोटे गुन्हे दाखल करणे,पोलिसांकडून पत्रकारांच्या छळाच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पत्रकारांना आणि विशेषत्वानं ग्रामीण पत्रकारांना काम कऱणं अशक्य झालेलं आहे.त्याला आता संघटीत विरोध झाला पाहिजे.त्यामुळंच 15 च्या आंदोलनात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी” असं आवाहन त्यांनी केलं आहे.राज्यातील पत्रकारांच्या अन्य मागण्यांसाठीही सरकारवर दबाव आणण्यात येईल अशी माहिती पाठक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रानं घालून दिलेल्या आदर्शानुसार आता अन्य राज्यातील पत्रकारही एका बॅनरखाली एकत्र येत आहेत हा फोर मठा सकारात्मक बदल होताना दिसत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याची प्रत्रिक्रिया एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.मध्य प्रदेशमधील पत्रकारांच्या आंदोलनास पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here