एन.एच.17बद्दल सामनात सविस्तर स्टोरी..

0
749

रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनानंतर मुंबई ते गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास 2012 मध्ये सुूरूवात झाली.पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरचे काम तीन वर्षात तीस टक्के देखील झाले नाही.त्यामुळे पनवेल ते वडखळ नाका हा रस्ता पुर्वी होता त्यापेक्षा वाईट झाला.60 किलो मिटरचे हे अंतर कापायलाही सहज दीड -दोन तास लागतात. कारण रस्तयाचे काम गेली पाच-सहा महिने बद असल्याने सारा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे.शिवाय डायव्हर्शन,पुलाची अर्धवट झालेली कामं,यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे काम नसते सुरू झाले तर बरे झाले असते असं म्हणण्याची वेळ स्थानिकांवर येत आहे.बंद पडलेले महामार्गाचे काम पुन्हा सुरू करावे यामागणीसाठी रायगडमधील पत्रकारांनी 24 जानेवारी रोजी पेण येथे एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोको आंदोलन केले होते.त्यानंतर सरकारनं याची दखल घेत महार्गाचे काम पुन्हा ताताडीने सुरू कऱण्याची घोषणा केली होती.मध्यंतरी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगडचा दौरा करून महामागाची पाहणी करीत मार्चपर्यत काम सुरू कऱण्याचे आश्वासन दिले होते.मात्र अजूनही हे काम सुरू झालेले नाही.या सर्व घटनाक्रमाची सविस्तर माहिती देणारी एक सविस्तर स्टोरी रजनीश राणे यांनी आजच्या सामनात दिली आहे.या महामार्गाची माहिती जाणून घेणाऱ्यांसाठी ही स्टोरी उपयुक्त ठरणारी आहे.कोकणाच्यादृष्टीनं महत्वाच्या असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाकडे शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल सामनाचे मनःपूर्वक आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here