अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेले योगगुरू रामदेव बाबा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या NDTV या चॅनेलची विक्री करण्याचा प्रस्ताव असून ही वाहिनी विकत घेण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनी ही भारतामधील प्रतिष्ठित वाहिन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. एकेकाळी प्रसारमाध्यमांच्या विश्वात एनडीटीव्हीचा चांगलाच दबदबा होता. मात्र, गेल्या काही काळापासून एनडीटीव्हीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सध्या चॅनेल मोठ्या तोट्यात सुरू आहे. मात्र, डिजिटल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात एनडीटीव्हीला बऱ्यापैकी फायदा होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात विस्तार करण्याचा एनडीटीव्हीचा मानस आहे. त्यामुळे एनडीटीव्ही चॅनेल विकण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

एक्सेंज फॉर मीडिया. कॉम’ या संकेतस्थळाच्या वृत्तानुसार चॅनेलच्या विक्रीसंदर्भात गुंतवणूकदारांशी बोलणी सुरू आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचाही समावेश असून त्यांनी चॅनेलच्या भागधारकांशी प्राथमिक बोलणी केल्याचे वृत्त आहे. अनेक इंग्रजी वृत्तवाहिन्यांवरही याच बातमीची चर्चा आहे.  या मात्र, यासंदर्भात एनडीटीव्हीचे सीईओ केवीएल नारायण राव यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या तिमाहीत एनडीटीव्हीला ३६८.३२ कोटींचे उत्त्पन्न मिळाले होते. गेल्यावर्षी याच तिमाहीत एनडीटीव्हीने ३९६.०३ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे कंपनीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी नवीन मालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे व त्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्पर्धेत अचानकपणे रामदेव बाबांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुर्तास एनडीटीव्ही आणि रामदेव बाबांच्या प्रवक्त्यांकडून या वृत्ताचा इन्कार केला जात आहे.

लोकसत्तावृत्त

मोदींच्या राजवटीत रामदेव बाबांना २ हजार एकर जमीन, ३०० कोटींची सवलत

First Published on June 5, 2017 4:54 pm

W

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here