मुंबईः आपल्या विरोधात वृत्त प्रसिध्द करणार्‍या माध्यमांना अद्यल घडविणयासाठी त्यांच्यावर एवढया प्रचंड रक्कमेचे अब्रुनुकसानीचे दावे दाखल करायचे की,नंतर विरोधात बातमी देण्याची कोणाची हिंमत होणार नाही..हा नवा ट्रेेंड लोकप्रिय होताना दिसतो आहे.मध्यंतरी अमित शहांच्या चिरंजीवांच्या कंपनीच्या झालेल्या भरभऱाटीबद्दल एका वेबसाईटनं बातमी दिली तर त्या वेबसाईटवर शंभर कोटींचा दावा दाखल केला गेला.लैगिक शोषणाचे आरोप झालेले एम.जे.अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात एक कोटी रूपायंचा दावा दाखल केलेला आहे.आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एनडीटीव्हीच्या विरोधात 10 हजार कोटी रूपयांचा दावा ठोकला आहे.राफेल खरेदी व्यवहारात एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमामुळे कंपनीची बदनामी झाल्याचा दावा करीत थेट दहा हजार कोटींचा दावा दाखल केला गेला आहे.भविष्यात आपल्या विरोधात कोणी वृत्त प्रसिध्द करता कामा नये यासाठीच ही दमबाजी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.वास्तवात राफेलबद्दल बहुतेक सर्वच वाहिन्यांनी बातम्या प्रसारित केल्या आहेत.तरीही केवळ एनडीटीव्हीलाच लक्ष्य करण्यात आलं आहे.
एनडीटीव्हीच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी म्हटले आहे की,आम्हाला त्रास देण्यासाठी आणि मनात दहशत बसविण्यासाठीच हा दावा ठोकण्यात आला आहे.प्रसार माध्यमांना त्यांचं काम करू न देण्यासाठी हा दावा ठोकला गेल्याचं एनडीटीव्हीचं म्हणणं आहे.आम्ही या विरोधात लढणार असल्याचे सिंंह यांनी स्पष्ट केलं आहे.त्या म्हणालया,राफेल संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी अनेक वेळा रिलायन्स समुहाच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आलं मात्र त्याकडं त्यांनी दुर्लक्ष केल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.
केंद्र सरकारनं फ्रान्सकडून 58 हजार कोटींना लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार केला.अनिल अंबानी यांच्याकंपनीबरोबर दासूला करार करावा लागला होता.यामध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीची 30 हजार कोटींची धन केल्याचा आरोप केला जात आहे.आतापर्यंत राजकीय मंचावरून लढले जाणारे राफेल वॉर आता या खटल्यामुळं कोर्टात गेले आहे.

LEAVE A REPLY