एक सेल्फी तो बनती ही है ना?

0
622

आम्ही नवरा-बायकोंनी दोन-तीन पदव्या मिळविल्या.पण पदवीदान समारंभास उपस्थित राहून टोप्या हवेत भिरकविण्याचा आनंद कधी घेता आला नाही.ती रूखरूख काल सुधांशूच्या पदवीदान समारंभाच्या निमित्तानं भरून काढली.सुधांशूच्या सिम्बॉयसीस कॉलेजचा बारावा पदवीदान कार्यक्रम काल लवळे येथील टेकडीवर पार पडला.आम्ही काल दिवसभर तेथे होतो.गाऊनमध्ये दिसणारे हजारो मुलं,त्यांच्या उत्साहाला आलेले आनंदाचे भरते पाहून आम्हालाही आमच्या कॉलेजचे दिवस आठवले.विशेष म्हणजे टेकडीवर फोनला रेंज मिळत नसल्यानं कुणाचा फोन आला नाही.त्यामुळं मुलाच्या संगतीनं मनसोक्त आनंद लुटला.मजा आली.या आनंदाच्या क्षणी एक सेल्फी तो बनती ही है ना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here