एका पत्रकाराच्या मुलीची यशस्वी भरारी

0
991

वडवणीः जगाची उठाठेव करताना बहुतेक पत्रकारांचं आपल्या घराकडं दुर्लक्ष होतं.अनेकदा मुलांच्या शिक्षणाची देखील आबाळ होते.अशा स्थितीतही आणि वडवणी सारख्या ग्रामीण भागात राहून जेव्हा एखादया पत्रकाराची मुलगी उल्लेखनीय यश प्राप्त करते तेव्हा तो विषय नक्कीच कौतूकाचा असतो.वडवणीचे पत्रकार अनिल वाघमारे यांची सुकन्या कु.प्रगतीच्या बाबतीत असंच घडलं आहे.अनिलराव स्वतःचं डोंगरचा राजा नावाचं साप्ताहिक काढतात.निष्ठेनं काढतात.गेल्या दोन वर्षात एकाही अंकाचा खंड न पडता आणि अगदी आदर्शवत हे साप्ताहिक चालवतात.त्यामुळं त्यांची नेहमीच धावपळ असते.शिवाय डोंगरचा राजा नावानंच यू ट्यूब चॅनल आणि पोर्टलही चालवतत.संघटनेचं कामही करतात.या सार्‍या गडबडीत मुलांकडं हवं तेवढं लक्ष देणं अशक्य होतं.असं असतानाही त्यांची मुलगी प्रगतीनं मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणार्‍या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ( जी – पॅट ) परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे.ती बीडच्या आदित्य बी फार्मसी कॉलेजमध्ये शिकते.अनुसूचित जाती जमातीच्या रॅन्कमध्ये 103 गूण मिळवून तीने देशात 7417 वा क्रामांक पटकावला आहे.आदित्या बी फार्मसी कॉलेजमधून प्रगती ही एकमेव विद्यार्थीनी या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.तीच्या या यशाबद्दल तीचं सर्वत्र कौतूक होत आहे.प्रतिकूल परिस्थितीतही आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत प्रगतीनं मिळविलेलं हे यश उल्लेखनिय आणि अभिनंदनीय तसेच इतर मुलांना नक्कीच प्रेरणा देणारे आहे.या यशात प्रगतीची आई सौ.अनुराधा वाघमारे यांचा मोठा वाटा आहे.त्यानी मुलांच्या शिक्षणाकडं विशेष लक्ष दिले.अनिल वाघमारे यांचा प्रशिक हा मुलगा सध्या पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय..मुलांची प्रगती ही आई-वडिलांसाठी मोठी आनंदाची बातमी असते.तेच पत्रकारांचं भांडवल देखील असतं.त्यादृष्टीनं अनिल वाघमारे नशिबवान ठरले आहेत.प्रगती आणि अनिल वाघमारे कुटुंबियांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here