लाईव्ह कार्यक्रम सुरू असतानाच टीव्ही ऍंकरने आम्ही संपावर जात असल्याची घोषणा करावी है ना डेअरिंगवाली बात.. अशी हिंमत दाखविली आहे एका टीव्ही अँकर पत्रकाराने.केरळमध्ये मल्याळम भाषेत पहिले 24 तास बातम्या देणारे चॅनल असलेल्या इंडिया व्हीजनचे अँकर अभिलाष ने आपल्या शो च्या वेळेसच चॅनलमधील कर्मचारी संपावर जात असल्याची घोषणा केली.त्यानंतर चॅनल बंद पडले आणि मिडियाकर्मी संपावर गेले.भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या कार्यकारी संपादक एम पी बशीर आणि न्यूज कोऑर्डिनेटर वी उन्नीकृष्णन यांनाच व्यवस्थापनाने कामावरून कमी केल्याने सारेच पत्रकार संतापले.आणि त्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली.लाईव्ह कार्यक्रमात त्याची घोषणाही केली गेली.अशा प्रकारची घटना भारतीय टीव्हीच्या दुनियेत पहिल्यांदाच घडली आहे.
इंडिया व्हिजन 2003मध्ये लॉंच केले गेले.त्यानंतर चॅनलने विविध स्टीग ऑपरेशन करून सनसनाटी निर्माण केली होती.आज काही कर्मचाऱ्यांना घेऊन टीव्ही व्यवस्थापनाने प्रक्षेपण पुन्हा सुरू केले असले तरी अनेक कार्यक्रम बंद पडले आहेत.