45 शेतकऱ्यांचे बांधावर सत्कार

0
707

रायगड प्रेस क्लबचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ कऱणाऱ्या रायगडमधील 45 शेतकऱ्यांचा आज रायगड प्रेस क्लबच्यावतीने रायगड कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.रायगडमधील पंधरा तालुक्यात एकाच वेळी आणि एकाच दिवशी हे कार्यक्रम झाले.विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हे सत्कार केले गेले.पत्रकारांच्या या अभिनव उपक्रमाची आज जिल्हाभर चर्चा होती.सामाजिक जाणिव ठेवत पत्रकारांनी दुर्लक्षित घटकांचा सत्कार घडवून आणल्या बद्दल शेतकऱ्यांनी रायगडमधील पत्रकारांना धन्यवाद दिले.एखाद्या पत्रकार संघटनेने एकाच वेळेस संपूर्ण जिल्हयात असा उपक्रम राबविण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमास जिल्हयात आज सर्वत्र जोरदार पाऊस असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला.रायगड प्रेस क्लबच्या जिल्हयातील पंधरा तालुक्यात शाखा आहेत. या शाखांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येकी तीन आदर्श शेतक़ऱ्यांची निवड करून त्यांचा शेतावर जाऊन सहकुटुंब सत्कार केला.आपलेपणाच्या जाणिवेतून केल्या गेलेल्या या सत्काराने शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय भारून गेल्याचे दिसत होते.कर्जत,आणि खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या्‌ सत्कारासाठी रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख उपस्थित होते.
समारोपाचा कार्यर्कम कर्जत येथे झाला.यावेळी बोलताना एस.एम.देशमुख यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केवळ चिकाटी.आणि जिद्दीच्या बळावर शेतकऱ्यांनी जे यश मिळविले आहे ते केवळ कौतूकास्पदच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांनी अनुकरण करावे असे आहे असे सांगितले.वेगळा मार्ग चोखळून यशस्वी झालेल्या शेतकऱ्यानी अन्य शेतकऱ्यांनाही आपले अनुभव शेअर करावेत असे आवाहन देशमुख यांनी केले.पुढच्या वर्षीपासून दर वर्षी कृषीदिनाच्या दिवशी हा कार्यक्रम व्हावा अशी सूचना देशमुख यांनी केली.रायगडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी यशस्वी शेती करून दाखविली आहे त्यांचे अनुभव मराठवाड्यातील शेतकऱ्याना ऐकायला मिळावेत यासाठी बीड जिल्हयात शेतकऱ्यांचा एक मेळावा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संतोष पवार यांनी आपल्या भाषणात दिली.या मेळाव्यासाठी कृषीभूषण शेखर भडसावळे यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्याना मार्गदर्शन कऱण्याचे मान्य केले आहे.या कार्यक्रमास परिषदेचे कार्यालयीन चिटणीस श्रीराम कुमठेकर ,हनुमंत पिंपळे आणि शेतकरी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचे सत्कार ंसंमारंभ य़शस्वी करण्यासाठी सवश्री संतोष पवार,अध्यक्ष विजय पवार,माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,अभय आपटे,संतोष पेरणे,दर्वेश पालकर,नागेश कुलकर्णी,प्रशांत गोपाळे,मुकुंद बेम्बडे,भारत रांजनकर,विजय मोकल,दत्ता म्हात्रे,शशिकांत पवार,या तसेच जिल्हयातील दोनशेवर पत्रकारांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here